Will avenge Afzal Guru’s execution : Pak militants
पाकिस्तानात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी इस्लामाबाद इथल्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये एक सम्मेलन आयोजित करून त्यात ही घोषणा केलीय कि भारतीय संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुच्या फाशीचा बदला घ्यायचाच. या संम्मेलनाचं आयोजन युनायटेड जिहाद काऊन्सिलच्यावतीनं करण्यात आलं होतं. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तानच्या राजधानीत दहशतवादी संघटनांनी ही सार्वजनिक सभा आयोजिक केली होती. यापूर्वी या सभा रावळपिंडी तसंच लाहोरमध्ये आयोजित केल्या जात होत्या.
दहशतवाद्यांच्या या बैठकीत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, बद्र मुजाहिदीन, जमियत-उल-मुजाहिदीन, हरकत-उल-मुजाहिदीन आणि जिहाद काऊन्सिलच्या अनेक नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारताविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
‘अफजल गुरुच्या फाशीचा बदला कसा घ्यायचा, हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे’ असं म्हमत जैश ए मोहम्मदचा ज्येष्ठ नेता मुफ्ती यानं एकप्रकारे धमकीच दिलीय. अफजल गुरूच्या फाशीनंतर आणि काश्मीरमधल्या घडामोडींसंदर्भात पाक मूळ गिळून गप्प बसलंय, असा दावाही या संघटनांनी यावेळी केलाय.
Source : Marathi Unlimited.