केसांसाठी आरोग्य व निगा !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

केसांसाठी  आरोग्य ! व निगा !

Top Hair Care Questions Answere
केसांच्या वाढी साठी काही उपयुक्त पदार्थ *(जीवन सत्व अ), हिरव्या पाले भाज्या, पिवळ्या रंगाची फळें, गाजर, पपई, मूळयाची पानें, मेथी, पालक, माठ, कोथिंबीर, कढीनिंबाची पानें, पुदिना, आंबा वै.!  *(जीवन सत्व ब) भाताचा तूस, हातसडीचे तांदूळ, मोड आलेले गहू, कोंड्या सहित  कणिक, नाचणी, शेंगदाणे, तिळ वै. ! *(लोह)  हिरव्या पालेभाज्या, आळू , चवळाई, मेथी, पालक, माठ,  करवंदे, हरबरा डाळ, भेंडी वै !  *(तांबे) लीव्हर, मासे, तेलबिया, *(आयोडीन)– समुद्राती मासे, समुद्रातील खडे, समुद्रा जवळच्या भाज्या, टमाटर, अननस, वै! (आसन) — शीर्षासन, सर्वांगासन, व प्राणायाम अवश्य करावा, या मुळे मस्तक शांत व थंड राहते. त्यामुळे केसांची निगा राखली जाते.

*** डोक्यातील कोंडा होणार नाही यासाठी हे करावे: सतत कढत पाणी डोक्यावर घेणे टाळावे,अतिशय सूर्य प्रकाशात वूघ्द्या दोकाने वावरणे टाळावे, अधिक मसाज यानेही केस कमकुवत होतात, व कोंडा हि जास्त होतो, केस गार पाण्यानेच धुवावे. केस  कापल्याने ते चागले वाढतात, — दहा वर्षाच्या नंतरच्या वयात केसांची वाढ झपाट्याने होते, त्यांमुळे या वयात जास्त काळजी घेणें महत्वाचे आहे. या वयात एका महिन्यात एक इंच केस वाढतात. २० ते २२ या वयात केस जास्त वाढतात. जीवनातील सर्व दृसटीने महत्वाचा हा काळ असतो. म्हणून केस तुटणार नाहीत, त्यांच्या मुलांना धक्का पोचणार नाही.याची विशेष काळजी घ्यायला हवी.

Hair Spa Treatment Hair Spas & Salo marathi unlimited

**(cortisones) मुळे  केसांची वाढ जोमाने होते, पण हार्मोन्स चा पुरवठा बंद झाल्यावर केस पूर्ववत गळतात. केस अकाली पांढरे झाले असल्यास ते  पूर्ववत काळे करणारी तीन जीवन सत्वे आहेत, ती सर्व ब जीवनसत्वा पैकी आहेत. ती अशी pantothenic acid , paraaminobenzoic acid, inositol acid हि तीन जीवनसत्वे होत, या तीन जीवनसत्वांचे रोजचे प्रमाण असे असावे पहिले १० मी.ग्र्याम, दुसरे १०० मी.ग्र्याम, तिसरे २००० मी. ग्र्याम. या प्रमाणे हवे हि जीवनसत्वे याआहारात मिळतात. (पहिले जीवनसत्व– लिव्हर यिष्ट, अंड्यातील पिवळा बलक, शेंगदाणे, बटाटे, टमाटर, मांसे, मोड आलेली धान्य. (दुसरे जीवनसत्व– यिष्ट, लिव्हर, काकवी, भाताचा कोंढा,गव्हाचे सत्व. ( तिसरे जीवनसत्व– फळे, दुध, यिष्ट, पालेभाज्या, पूर्ण धान्ये, तेलबिया, लिव्हर. )

***  ताक उपयुक्त ( Useful curd )—-  आपले केस पुर्ववत काळे झाले पाहिजे असे वाटत असेल तर दररोज भरपूर अधमुरे दह्याचे ताक घ्यावे.
त्या ताकात शरीरातील ब जीवनसत्वे वाढविण्याची शक्ती आहे. तसेच दररोज सकाळी गव्हाचे सत्व नियमित घेत जावे. व प्रत्येक जेवणाचे अगोदर यिष्ट च्या चार गोळ्या घ्याव्या. ज्यांना अनिमिया झाला आहे अश्याचे केस लवकरच पांढरे होतात. आपल्या आहारात तांब्याचे प्रमाण कमी असेल तर आपले केसांचा रंग बदलतो. त्याच प्रमाणे मानसिक ताण, अति शारीरिक श्रम या मुळेही केस लवकर पांढरे होतात.केस गळण्याचे योग्य कारण म्हणजे योग्य आहारातील घटकांची कमतरता होय.

***  केसांचे फायदे ( Uses of Hairs)— केसांचे फायदेही अनेक आहेत.  ते फार महत्वाचे आहेत. केसांमुळे शरीरातील न विरघळणारी घाण बाहेर टाकली जाते. आपले केस म्हणजे फक्त डोक्यावरलच केस नव्हेत ते सर्व ठिकाणचे केस होत. केस हे पेशीनपासून बनलेले असतात. केसांची मुळे त्वचे मध्ये असतात. त्यांच्या मुळाशी रक्त वाहिन्या असतात. त्यामुळेच सतत पेशी निर्माण होत असतात. त्या वरती येतात व मृत होऊन नाहीश्या होतात. हा क्रम सतत चालू असतो. आणि म्हणूनच केस उपटला कि पेशी जिवंत असल्या मूळे त्रास होतो. पण केस कापताना तो होत नाही कारण केसांवरील भागात पेशी मृत झालेल्या असतात.  केसांच्या मुळाशी स्नायू असतात. त्यांच्या आकुंचन व प्रसरण पावण्याच्या क्रियेमुळे केस कधी कधी ताठ उभे राहतात.

***  निसर्ग नियमा प्रमाणे शरीरातील हि न वीरघळनारी घाण शरीरावर कोठेही केस वाढवून ती बाहेर टाकत असते. छाती, हात, पाय, पाठ,  तोंड, या वरही केस वाढतात. हि क्रिया निसर्ग नियमा प्रमाणे अधिका अधिक घाण बाहेर टाकण्या करीता असते.

माणूस अयोग्य आहार, विचार, क्रोध आणि ईतर हि वागणुकींमुळे नैसर्गिक कार्यात अडथळे निर्माण करीत असतो, ज्याप्रमाणे, मोठे आतडे, फ़ुफ़ुस, त्वचा, मूत्रपिंड इ. अवयव घाण बाहेर टाकतात. त्याच प्रमाणे केस हि त्यास मदत करतात. जेवढी घाण अधिक बाहेर पडेल तेवढी केसांची वाढ जोमाने होईल. आणि आरोग्य चांगले राहील.  कित्येक वेळा काही व्यक्तींच्या बाबतीत नको त्या ठिकाणी म्हणजे तोंडावर, ओठांवर केस आलेले दिसतात ज्या प्रमाणे शरीरातील ड्रेनेज पद्धतीत बिघाड झाला म्हणजे घाण पाणी कोठूनही व्रण करून वाहू लागते त्याच प्रमाणे योग्य प्रकारे घाण बाहेर न पडल्यास नको त्या ठीकाणी जोरात केस वाढू लागतात. केसांची वाढ आणि गळणे हे अनुवंशिक तेवर अवलंबून असते. कोणत्याही उपायांनी अश्या कुटुंबातील टक्कल नाहीशे करता येणार नाही. त्या करीता अनेक लोंक प्रयत्न करीत असतात. या साठी अजून तरी योग्य उपचार सापडलेला नाही.


Read More on Health Tips:

आरोग्य ( Health ): मानवाच्या शरीरातील सर्व गोष्टींकडे काळजी पूर्वक लक्ष द्यावे लागते.शिरीरातील प्रत्येक घटक हा महत्वाचा मानला जातो.केसा मुळे स्त्री-वा -पुरुष असो शरीराचे सौंदर्य वाढते,शरीरात हे केस कसे निर्माण होतात,त्याचे कार्य काय आहे या गोष्टी मनोरंजक आहेत. * एलुमिनियम हा धातू आपण नेहमीच पाहतो. तो फार मजबूत व बळकट असतो.त्याच्यात शक्ती पण बरीच असते.आपल्या डोक्यावरील सर्व केस एकत्र करून त्याचा चांगला दोर बनविला तर तो दोर एक हजार किलो वजन अगदी सहज उचलु शकतो. आपल्या शरीरावर  कमितकमी पाच लक्ष केस आहेत.यात तळ हात, तळ पाय, ओठ, कपाळ वै .भाग सोडल्यास शरीराच्या सर्व भागावर केस असतात.

केसांचे – आरोग्य-!

केसांचे आरोग्य चांगले राहण्या साठी प्रथिने, जीवनसत्वे अ, ब, लोह, तांबे, आयोडीन, या घटकांची विशेष आवश्यकता असते, आयोडीन हा एक प्रकारचा क्षारच आहे. या क्षाराचा शरीरावर व मनावर फार चांगला परिणाम होतो. समुद्राच्या सानिध्यात या क्षाराचे प्रमाण खूप असते. त्यामुळे समुद्र किनारीची माणसे तरतरीत व चपळ असतात. तेथील स्त्रियांचे केस लांब स्द्क्व काळेभोर असतात. तसेच समुद्रातील मासे, समुद्रातील खडे मीठ, समुद्राजवळच्या, भाज्या, अननस, टमाटर यात या क्षाराचे प्रमाण अधिक असते. आपल्या उपहारात जीवनसत्व अ चा जर अभाव असेलतर केस एकदम राठ, व निस्तेज दिसतात. तसेच आहारात जीवन सत्व ब व आयोडीन, लोह, तांबे यांचा अभाव असेल तर केस गळतात व पांढरे होतात. शरीरातील काही ग्रंथी पासून जो स्त्राव निघत त्याला हार्मोन्स म्हणतात. या स्त्रावान मुळे अवयवांना चेतना मिळते. याचाहि आपल्या केसांवर परिणाम होतो. गर्भवती स्त्रियांच्या केसांची खुप वाढ  होते. पण बाळंतपणा नंतर केस खूप गळू लागतात.

Source  : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu