कडूनिंब घरघुती दवाखाना !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
12141

Neem Tree (Nimba), Uses of Neem, Significance of Neem

The Benefits of the Neem Tree

अमेरिकेत एका संशोधन शाखेत १९९२ साली प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष ‘निम ए ट्री फॉर सोल्व्हिंग ग्लोबल प्राब्लेम्स’ या पुस्तकात सांगितले गेले आहे. सध्या जगापुढे असलेल्या पर्यावरण संरक्षण, वाळवंटाची होणारी वाढ, रासायनिक कीटकनाशकांमुळें अन्नात व पाण्यात वाढलेले विषारी द्रव्यांचे प्रमाण ह्या सर्व समस्यांवर कडूनिंबाचे झाड उपयोगी पडू शकते. अनेक आजारांवर याची पाने, फुले, साल उपयोगी पडू शकते. तसेच डॉक्टरांच्या संशोधनानुसार ‘एड्स’ सारख्या दुर्धर रोगांवर कडूनिंबापासून बनवलेले औषध उपयोगी पडते.

कीटक नियंत्रण व कीटक नाशक म्हणून कडुनिंबाचा उपयोग ! ( Neem Can Be used as Pesticides)

कडूनिंब हा मुळ्चा भारतीय वृक्ष आहे. परंतु अति परिचयाचा असल्यामुळे आपल्याला त्याचे महत्व वाटत नाही, कडुनिंबाची झाडे ज्या देशात निसर्गत: उगवत नाही अश्या अमेरिका जर्मनी सारख्या देशांत निंबाच्या कीटक नाशक गुण धर्मा बद्दल शास्त्र शुद्ध संशोधन व अभ्यास झाला आहे. जगातील पहिले कडूनिंबापासून बनविलेले कीटक नाशक मार्गोसान अमेरिकेत तयार झाले. कडूनिंबापासून बनलेल्या कीटक नाशकामुळे २०० प्रकारच्या किडींचे नियंत्रण करता येते. आणि ते कीटक नाशक मानवा करीता संपूर्ण सुरक्षित आहे. पिकांवरील कीडींवरच त्याचा परिणाम होतो.  १) ज्या पिकांवर त्याची फवारणी होते. तो भाग किडींना आवडेनासा होतो. व त्यामुळे ते भुकेने व्याकुळ होऊन तीन ते पाच दिवसात मरतात. २) फवारलेली पिके अळी ने खाल्ल्यास ती पुन्हा कोष करू शकत नाही. कोषावस्थेत मरते. ३) किडीला अंडी घालण्या साठी अटकाव होतो आणि घातली तरी अंड्यांची संख्या कमी होते, अंडी वांझ होतात. किटकात दोष निर्माण होतात त्यांमुळे कीटकांची प्रजा वाढू शकत नाही. ४) यातील दुर्गंधी मुळे कीटक पिकांपासून दूर होतात.

कीटक नाशक कशी बनवितात.? (How to Make Pesticides from Neem)

१) निंबोळी बारीक करून ती रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसरे दिवशी हा अर्क कापडातून गाळून नंतर पिकांवर फवारा. २० ते ३० किलो निंबोळ्यांच्या अर्का पासून साधारण: १ हेक्टर वर फवारा करता येतो. १/२ किलो बुकटी करीता १० लिटर पाणी लागते.
२) हिरव्या पानांचा अर्क —झाडाची हिरवी पाने वर्ष भर मिळू शकतात. पाने सावलीत वाळवून ग्राइंडरवर बारीक करून पावडर करावी. ह्याचा उपयोग झाडाच्या मुळाजवळ होऊ शकते. तसेच बी. एच.सी पावडर प्रमाणे बुकटी  चा प्रयोग करता येईल.
३) निमबाचे तेल–  या तेला पासून गेरवा, व भुरी रोगाचे नियंत्रन होऊ शकते. तेलाचे द्रावण करून ते पिकावर फवारल्यास कीटक नाशक व बुरशी नाशक असा दुहेरी उपयोग होतो. कडूनिंब हा गावात किंवा जवळपास उपलब्ध होऊ शकतो. आणि निंबोळ्या भरपूर प्रमाणात मिळू शकते. त्या गोळा करून साठवून ठेवाव्या त्या केव्हाही कामी येतात.

निंबाचे जास्त तीव्रतेचा अर्क कसा काढतात.?

कडू निंबा – पासून जास्त तीव्रतेचे द्रावण तयार करण्या साठी बारीक केलेले निमबोळीचे मगज अल्कोहोल मध्ये भिजवितात. लीमोनाईडस हे द्रव्य अल्कोहोल मध्ये विरघळते.

वनीकरणासाठी कडूनिंब ! ( Neem for Forestation)

ईमारती लाकूड म्हणून कडुनिंबाच्या लाकडाला महत्वाचे स्थान आहे. साग किंवा निलगिरीसारखी लागवड केल्यास निम्बाचे झाड सरळ वाढते. तसेच पाण्याची सोय केल्यास झपाट्याने वाढते. निंबाचे लाकूड बांधकामासाठी उत्तम असून सागवना पेक्षा मजबूत आहे. याच्या लागवडी मुळे वातावरण शुद्ध हून रोग ज्नतुचा नाश होतो. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा याची वाढ चांगली होते. या वृक्षांन मुळे हवेतील प्राण वायूचे प्रमाण वाढते. रोग जन्तुचे अस्तित्व कमी होऊन वातावरण निरोगी बनते. या वृक्षाच्या सावली मुळे वातावरण थंड व सुसह्य होते. आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य सुधारते तसेच हिवताप, कॉलरा या पासून बचाव होतो. निंबाचे झाड हे निसर्गाने तयार केलेले इंटेन्सिव केअर युनिट आहे. या नैसर्गिक साधन संपत्ती चा उपयोग घेऊन आपले तसेच शेतीचे तसेच आरोग्याचे प्रश्न कमी खर्चात व स्थायी स्वरूपात आपण सोडवू शकतो.

आता आपण निंबाचे औषधी उओयोग पाहुं ! ( Neem used as Medicine)

निंबाच्या प्रत्येक भागाचा औषधी उपयोग होत म्हणून त्याला ग्रामीण व घरघुती दवाखाना म्हणतात. तसेच आयुर्वेदांत निंबाला अनन्य महत्व दिले आहे. १) जंतुनाशक व रक्त शुद्धीकारक आहे २) थकवा दूर करतो, अशक्तपणा, मानसिक ताण, श्वास घेण्यातील अडथळा दूर करतो.शरीराचे तापमान नियंत्रित करतो. ३) चर्म रोगांवर अत्यंत गुणकारी तसेच कुष्ठरोग निवारण करतो. ४) मुत्र विकार, तसेच पचनसंस्थेचे विकार दूर करतो. ५) हृदयाला कार्यक्षम बनवितो. ६) लहान मुलांचे आजारावर अत्यंत गुणकारी. ७) मुळाची साल व पानांचा रस तापा मध्ये उपयोगी आहे. ८) तेलांपासून बनविलेले साबण जंतू नाशक म्हणून वापरतात. अजूनही ग्रामीण भागातील वैद्यांना असा विश्वास आहे कि जर आजारी माणसाला नुसते निंबाच्या झाडाखाली झोपविले तरी आजार बरा होऊ शकतो.  जागा असल्यास आपल्या अंगणात अवश्य कडूनिंब लावाच.

Neem the most medically useful tree of all time

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
12141




, , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu