Sushilkumar’s Press conference on Guru
संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूला अखेर शनिवारी फाशी देण्यात आली. आणि त्यावर उठलेल्या वादळावर बोलताना गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज स्पष्ट केले कि संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू याला देण्यात आलेली फाशी ही कायद्यानुसारच होती. अफझल गुरूला फाशी देण्यामागे कुठलंही राजकारण नसल्याचंही शिंदे म्हणाले. गुरूला फाशी देणार असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला ७ फेब्रुवारीलाच देण्यात आली होती. दुसऱ्या दुवशी ८ फेब्रुवारीला जम्मु- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी अफझल गुरूच्या फाशीसंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अफझल गुरूला फाशी देण्यात आली, असं सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केलं. फाशीनंतर अफझल गुरूला कारागृह परिसरातच धार्मिक विधींनुसार दफन करण्यात आलं होतं. अफझल गुरूच्या कुटुंबाने अफझल गुरूच्या मृतदेहाची मागणी केली आहे. या मागणीवर विचार करू असा इशाराही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला आहे.
Source : Marathi Unlimited.