मधुमेह व त्यावरील उपाय म्हणजे व्यायाम !!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Some Tips to Lower Your Risk for Diabetes

आजार — मधुमेह व त्यावरील उपाय म्हणजे व्यायाम !!

i have a Diabetes , how do i take care of it

आपल्या स्वाथ्या साठी मनुष्याने काही तरी निश्चय करायलाच हवा. तो काय तर पाहू;

शारीरिक शिथिलता — मधुमेह हा–  हृद्य रोग, रक्तदाब व लखवा यान सारख्या अनेकरोगांचे जन्म स्थान आहे. व्यायाम या सर्व परिस्थिती मध्ये उपयोगी सिद्ध झाला मधुमेहाच्या नियंत्रणाची पहिली पायरी व्यायाम आणि पौष्टिक आहार आहे. गोळ्या व इन्सुलीनचा उपयोग त्या वेळेला केला जातो जेव्हा साखरेची मात्रा ”व्यायाम व आहार नियम” यांचे पालन करून सुद्धा नियंत्रित राहात नाही.

व्यायामाचे प्रकार ( Types of Exercise on Diabetes ) :  १) शरीरा मध्ये एकत्रित ग्लुकोज चा अधिकाअधिक उपयोग होतो. तेव्हा गोळ्या व इन्सुलींनची दिली जाणारी मात्रा कमी होते. आणि मधुमेहावर नियंत्रण सोपे होते. २) अतीरिक्त प्रमाणात जी चरबी कमी होते त्यामुळे हृद्य रोग, लकवा यासारखे जीव घेणारे रोग होण्याची शक्यता कमी राहते. ३) इन्सुलीनची कार्य क्षमता वाढते. ४) हृदयाची कार्यक्षमता वाढते. ५) मानसिक शांती मिळते. ६) वजन कमी होते.

Diabetes problems and fruits need to it

आतां व्यायाम कोणते? ( Which exercise need to do for Diabetes) : 

पोहणे, नृत्य, चालणे, ब्यडमींटन, टेनिस, घावने, जॉगिंग करणे, सायकल चालविणे, दोरी खेळणे इ. व्यायामाला ‘एरोबिक ‘म्हटले जाते. हे मधुमेंही साठी उपयोगी आहेत. या उलट, भारोत्तोलन हे व्यायाम लाभ दायक नाही. डोळ्यांवर मधुमेहाचापरिणाम डायबेटिक रोटिनोपैथि सारख्या स्थितीमध्ये मानेच्या रक्तवाहिन्यांवर या व्यायामा मुळे दबाव वाढतो. व यांमुळे आंधळे होण्याची शक्यता आहे. तेव्हा ‘एरोबिक’व्यायाम जास्त योग्य असते. (व्यायाम सुरु करण्यापूर्वी) ३५ वयाच्या जास्त वयाच्या मधुमेहींनी व्यायाम सुरु करण्यापूर्वी स्वत: चे पूर्ण मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे. जसे रक्तदाब, हृद्य रोगासाठी  (इ.सी.जी.) किंवा टी.एम.टी.(ट्रेड.मिल.टेस्ट)  डोळ्याची तपासणी (डायबेटीक रेटीनोपैथि) पायांच्या रक्तवाहिनीचा समुचित संचार व शुण्यपण यांची तपासणी. १) रक्तामध्ये साखरेची मात्रा खूप कमी किंवा खूप जास्त (३०० m.g.पेक्षा जास्त) असल्यास व्यायाम करू नये.  २) व्यायाम करण्यापूर्वी एक कप दुध घेतल्याने हायपोग्लासिमिया (साखर कमी होणे) ची शक्यता राहात नाही. ३) व्यायाम करताना आपले मधुमेहाचे पत्र सोबत ठेवावे. ४) हायपोग्लासीलया होऊ नये म्हणून साखर ग्लुकोजचे पाकीट नेहमी सोबत असावे. *** व्यायाम किती करावा? मधुमेहींचे वय, आवड, व शारीरिक स्वथ्यता या नुसार व्यायाम करणे हिताचे ठरेल. स्वस्थ मधुमेहींनी ३० ते ४० मिनिटे किंवा आठवड्यातून कमीत कमी चार दिवस अवश्य चालले पाहिजे.

 व्यायाम करण्याची सीमा ( Limit of Exercise ):  मधुमेही पेशंन्टच्या  वया नुसार त्यांच्या हृद्यगती वर निर्धारित केली पाहीजे.  जर मधुमेही रोग्याचे वय ४० असेल तर त्याची अधिकतम हृद्य गती (maximum heart rate ) = २००-४० , ( i.e. २००– age ) =१६० / minute यात ६०-८०% हृद्य गती म्हणजे ९६ ते १२८ प्रती मिनिट वाढे पर्यंत तुम्ही व्यायाम करू शकता.  हृद्य गती ११० प्रती मिनिट पर्यंत व्यायाम करणे सुरक्षित समजले जाते. या करिताच म्हटले कि प्रत्येक मधुमेहींना नवीन वर्षात हि शपथ घ्यायची आहे  ( निश्चय करायचा आहे)  कि ”तुम्ही आहार नियम व व्यायाम नियम” याचे पालन करून आपल्या या मधुमेही’ जीवन साथीला ‘दूर ठेवावा.

मधुमेह त्यावरील  आहार!  ( Food on Exercise ) : मधुमेही पेशंट चे जीवन खाण्या पिण्याच्या बाबत अत्यंत अनुशाषित असत. एकंदरीत जेवणावर बंधन लादायची नाहीत पण ते नियमा नुसार घेणे आवश्यक आहे. एक महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ३ ते ४ तासांनी काहीना काही तरी खायचं आहे. एकदम रिकाम्या पोटी राहायचं नाही.  आणि खूप पोटभर जेवायचं नाही. साखर, मिठाई आणखी अति गोड पदार्थाव्यतिरिक्त कोणताही आहार वर्जित नाही. फक्त आहार सांगितलेल्या नुसार घायचा आहे. आहार मात्र पोष्टिक असावा.

तांदूळ आलू फळे व मधुमेह ( Potato and  Diabetes) :
म्धुमेहीना बर्याच वेळा काही जना कडून भात खाऊ नये. आलू खाऊ नये असे सल्ले मिळतात. हे चुकीचे आहे. या धारणा डोक्यातून काढून टाकायला पाहिजेत. खाद्य पदार्थांना बंद न करता त्यांना सीमित प्रमाणात घ्यायला पाहिजे.हिरव्या पाले भाज्या यांचा जास्त उपयोग लाभदायी ठरतो.

दारू व मधुमेह ( Drinking and Diabetes  ) :
मधुमेह, ब्लडप्रेशर, हृदयविकार हे एकमेकांचे फार जवळचे सोबती आहे. १) दारूमुळे  शरीरात कोलेस्ट्रोल व ट्रायग्लीसराईड ( (चरबी) ची मात्रा वाढते. जी या सर्व रोगांना घातक आहे.  २) दारू मध्ये कोणतेही व्हीटामिन किंवा प्रोटीन नसते. केवळ जास्त कार्बोहाड्रेट कॉलरीज असतात. ३) दारू मध्ये साखरेची मात्रा एकदम कमी होण्याची श्यक्यता असते. रोगी कोमा मध्ये जाऊ शकतो. तेव्हा दारू न धेने श्रेयस्कर आहे. दारू घेणार्यांनी ६० मी.लि. च्यावर घेऊ नये. तरी त्यांनी हिरव्या पाले भाज्या जास्त प्रमाणात खाव्यात. जेवण न घेता कधीच दारू घेऊ नये.

साखरेचा उपाय ( Sugar and Diabetes) :
ज्या रोगींना गोड खाणे फार आवडते.त्यांच्या साठी एस्परटेम किंवा सक्रीन च्या गोळ्या अनेक नावांनी बाजारात उपलब्ध आहेत. या गोळ्या रोज ८ ते १२ घेऊ शकता. परंतु गर्भवती महिलांसाठी हे वर्जित आहे. स्क्रीन च्या गोळ्या घेतल्याने तोंडाला कडूपन येतो. त्यामुळे आजकाल अस्पारटेमचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. प्रदेशात यांचें बिस्कीट, जेली, चाकलेट उपलब्ध आहेत.

मधुमेह व शाकाहार ( Vegetarian and Diabetes ) :  सर्व जगात आहार सम्बन्धी जे संशोधन सुरु झाले आहे त्यात हे सिद्ध झाले आहे कि शाकाहारी जेवण मधुमेहीं साठी अत्याधिक  लाभदायक आहे. पश्चिमी सभ्यता पण हळूहळू शाकाहारा कडे आकर्षित होत आहे. हिरव्या भाज्या, सलाद, डाळ,गहू, बाजरा, ज्वार, याचे जास्त प्रमाणात सेवन म्हणजे मधुमेही साठीच नाही तर हृद्य रोगीं साठी सुद्धा लाभकारी आहे.

मधुमेह आणि मांसाहार ( Non Vegetarian Vs Diabetes ) :
नेहमी हा प्रश्न डोक्यात फिरत राहतो. कि काय मासाहार पुर्णपणे वर्जित आहे.  तर नाही तुम्ही आठवड्यातून एकदा मासाहार घेऊ शकता. मास उकडून, किंवा भाजून चिकन तंदुरी घेऊ शकता.मात्र मटन पासून दूर राहा. जास्त तेल असलेला मसाला घेऊ नका.साल्मन  मासे प्युना मासे चरबी  असल्यामुळे यांचे सेवन करू शकता अंड्याचा पांढरा भाग खावा.पिवळा बलक खाऊ नये.

मधुमेहीं आणि पनीर ( Paneer, Cheez Vs Diabetes) :
दुधावरची साय काढून घेतल्यास त्यातील क्यलरीज मात्रा कमी होते. जर मलाई रहित दुध त्यापासून बनवलेल्या दह्याचा उपयोग हितकारी आह ताकाचा उपयोग जेवण झाल्यावर केला जाऊ शकतो. या मध्ये हि क्यलरीज कमी असतात. मलाई रहित दुधा पासून बनलेले पनीर मधुमेहिंन साठी उत्तम आहे.

तेल, तूप, मीठ व मधुमेह (Oil Vs  Diabetes ) :
मधुमेहीं ना नेहमी तेल, तूप यांचे सेवन कमी प्रमाणात करायला पाहिजे.  १० मी.लि.  ते  २० मी.लि.  उप घेऊ शकता. हृद्य्रोगीना व लठ्ठपणांत यांचे सेवन कमी करायला पाहिजेत. जास्त रक्तचाप व गुर्दा रोग्यांना जास्त मीठ खाणे घातक सिद्ध होते. मधुमेहा सोबत जास्त रक्तदाब असल्यास मीठ व साखर हे दोन्ही ‘सफेद जहर’ सिद्ध होऊ शकतात.

थंड पेय व मधुमेही (Cold Drinks Vs Diabetes) :
दारू प्रमाणेच यांना सुद्धा ”एन्टी क्यलरीज मिल” असे म्हटल्या जाते. कारण यात कार्बोहाट्रेड शिवाय काहीही नसत. एक बॉटल कोला मध्ये ८० क्यलरीज असते. तेव्हा लठ्ठपणाच्या स्थितीत हे पेय न घेणेच उत्तम होय.

Source  : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu