इंडियन प्रिमीयर लीगच्या म्हणजेच आयपीएल (IPL) सहाव्या मोसमासाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाला होत आहे. चेन्नईमध्ये या लिलावाची सुरुवात झालेली आहे. क्रिकेटचा महासंग्राम म्हटल्या जाणारया इंडियन प्रिमीयर लीगची सहावी खेळी या वर्षी खेळली जाणार आहे. आणि या वेळेस ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे दोघे आता मुंबई इंडियन्स करिता एकत्र खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉंटिंगला मुंबई इंडियन्सने तर मायकल क्लार्कला अनुक्रमे पुणे वॉरियर्स संघाने विकत घेतले आहे. मुंबई इंडियन्सनं रिकी पॉन्टिंगला २ कोटी १० लाख रुपयांना विकत घेतलंय आणि आता तो सचिनच्या नेतृत्वात खेळणार आहे. यंदाच्या हंगामाची सर्वात अधिक बोली ग्लेन मॅक्सवेलला करिता लागली आहे त्याला मुंबई इंडियन्सनं ५ कोटी ३० लाखांना मध्ये विकत घेतलं आहे.
Source : Marathi Unlimited.