(Republican Party of India (RPI) chief Ramdas Athavale) रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणतात की राज मनसेला शिवसेनेत विसर्जित करा. आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचं संकेत दिले आहेत, ह्या दोन्ही पार्ट्या आता एकत्रित येणार याचे संकेत आहेत. मात्र राज ठाकरेंनी अजूनही आपले पत्ते खुले केलेले नाही, अजून राज ठाकरे कडून कसलेच संकेत मिळत नाही हे बघून रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना आव्हाहन केले आहे की मनसेला शिवसेनेत (Shiv Sena) विसर्जित करा आणि महा युती बनवा. जर राज पण शिव सेनेत आले तर महायुती अजूनच भक्कम होणार अशी अशा रामदास आठवले यांनी केली आहे. सुरुवातीला त्यांनी राज ठाकरे महायुतीत आले तर आपण महायुती तोडू अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती, मात्र तेच आता राज ठाकरे यांना शिवसेनेत येण्यास आव्हाहन करत आहेत. आता सर्व काही राज ठाकरे यांवर अवलंभून आहे कि ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ( MNS) कुठली दिशा देतात.
Source : Marathi Unlimited