सध्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भाजपकडून ( BJP’s Naredra Modi) नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात पुढे आहे. आता विहिपने मोदींच्या नावाला नेहरू बरोबर तुलना करून नवा वाद निर्माण केला आहे. विश्वहिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल (Vishwa Hindu Parishad’s Party Leader Ashok Singhal) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर (After India gets freedom) ज्याप्रमाणे पंडित नेहरू पंतप्रधान व्हावे अशी लोकांची मागणी होती. पहिल्यांदा पंतप्रधान (First prime Minister) झाले त्यावेळी लोकांमध्ये जशी उत्सुकता होती, तशीच उत्सुकता मोदींच्याबाबतीत लागू होत आहे, अशी प्रतिक्रिया सिंघल यांनी दिली आहे. सिंघल यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सिंघल यांच्या वक्तव्यावर काँग्रेस ( Congress party ) काय उत्तर देते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
Source : Marathi Unlimited.