ज्या प्रमाणे भारतीय पुरुष संघाने वर्ल्ड कपमध्ये आपल्या सुमार कामगिरीने संपूर्ण भारतीयांना चकाकून लावले तशीच अशा भारतीय महिला संघा कडून सुद्धा होती मात्र महिला वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान लीग राऊंडमध्येच संपुष्टात आलं आहे. भारतीय महिला संघाकडून जी अपेक्षा होती ती व्यर्थ राहिली आहे. लीग राऊंडमध्ये अखेरच्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे. लीग राऊंडमध्ये अखेरच्या मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताचा १३८ रन्सने (Indian beat by 138 Runs ) पराभव झाला. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या लंकेनं भारतासमोर भक्कम रन संख्या उभारली आणि विजयासाठी २८३ रन्सचं ( 283 Runs ) विशाल आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताची इनिंग १४४ रन्सवर ( 144 Runs ) आटोपली आणि याच पराभवाबरोबरच भारताचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. भारताला बाहेरचा रस्ता बघावा लागला आहे. महिला श्रीलंका संघाने फार सुमार कामगिरी केली आणि सहज विजय मिळवला . सिरिवरदेने सर्वाधिक २ विकेट्स ( 2 Wickets Tacken ) घेतल्या. आता सातव्या आणि आठव्या स्थानासाठी भारताचा मुकाबला पाकिस्तानशी होईल. टीम इंडियांच्या महिलांनी भारतीयांची पार निराशा केली त्यांना घरचा रस्ता पकडावा लागला. आता भारता कडे फक्त औपचारिकता उरली आहे आणि शेवटच्या सामन्यात भारताला सातवा किंवा आठव्या स्थाना करिता खेळावे लागणार आहे.
Source : Marathi Unlimited.