आम्लपित्त (एयसिडिटी ) आणि उपचार!
Like
Like Love Haha Wow Sad Angry
36

आरोग्य :  आम्लपित्त  (एयसिडिटी ) आणि उपचार!

If you have a acidity problem in my stomach continuously? Read this article:

acidity problems and solutions

१) दैनंदिनी जीवनात बर्याच मानवांना हा त्रास असल्याचे ऐकतो. त्यासाठी सामान्य मनुष्य काही घरघुती औषध आणि पथ्य पाळताना दिसतो. याची शास्त्रिय माहिती वेगळीच आहे. कालगतीमध्ये आपले जीवनमाप खूप बदललेले आहे. नवनवीन शोधांमुळे कामाचे, खाण्याच्या आवडीचे, पेय पदार्थांचे यासर्वांत फार बदल झाला आहे. तसेच व्यवसाय, नोकरी धंदा यामुळे कामाच्या स्वरूपातही बदल झाला आहे. माणसाच्या पोटात औषधी, खाद्य पदार्था मधील भेसळ, प्रदूषण यामुळे शरीरात अपायकारक अशी अनेक कृत्रिम रसायने जातात. निसर्ग नियमा प्रमाणे उठणे व झोपणे यातही बदल झाला आहे. या सर्व बाबींचा शरीरावर कमी -अधिक परिणाम होतो. बाह्य जंतूंच्या आक्रमणाने होणारा आम्ल पित्त हि व्याधी नसून वरील कारणांन मुळे  होणारा शरीरातील स्त्रावातील बदल हे याचे प्रमुख कारण आहे.

आम्लपित्ताची लक्षणे : जड पडणे, नेहमी नेहमी तोंड येणे, मळमळ +डोके दुखणे आणि आंबट-पिवळसर उलटी आल्यानंतर डोकेदुखी कमी होणे, थोडा वेळ जरी उन्हात गेल्यास डोके दुखणे, छातीत जळजळ होणे, वारंवार आंबट-कडू पाणी तोंडात येणे, हि लक्षणेज्यांना ”उर्ध्वग” आम्लपित्त आहे त्यांना दिसतात. काही प्रकृतीच्या व्यक्तींना नेहमीच्या खाण्यात थोडा जरी फरक पडला जरा कुठे कमी-अधिक खाण्यात आले कि लगेचच पातळ-पिवळट जुलाब होतात, सुरवातीत गुदभागाचा दाह होतो, आणि अश्या वेळेस २, ३ वेळा जुलाब होऊन आपोआपच बरेही वाटते. या प्रकाराला ”अधोग” आम्लपित्त म्हणतात. पचणा संबंधीची तक्रार असणे, अशक्तपणा वाटणे हि सर्व लक्षणे रोगाच्या प्राथमिक अवस्थेत बर्याच जणांना असतात. पण ज्या वेळेला रोग्याने पुढची पायरी गाठलेली असते आणि आम्लपित्ताचे रुपांतर आमाशयव्रणा मध्ये होते, अश्या वेळी खूप जास्त वेदना, छातीत अतिशय जळजळ, कॉफी रंगात उलटी होने अशी लक्षणे दिसतात. भूक सहन न होणे हे आम्लपित्ताचे प्रमुख लक्षण आहे.

Ways to get rid of Acidity-Naturally

(आम्लपित्त हे आयुर्वेदात तीन प्रकारात विभागले गेले आहे.)

१) आहारजन्य कारणे– आपण जो काही आहार घेतो, त्यावर आपल्या शरीराचे आरोग्य अवलंबून असते. अमुक एक पदार्थ खाल्ला आणि त्यामुळे उलट्या झाल्या असतील तर उलटी होण्याचे कारण तो पदार्थ आहे, असा सहज निष्कर्ष काढून त्या पदार्थाला उल्तीचे आहारजनी आहे असे म्हनतात.खूप मसालेदार, तळलेले, आंबट, शिळे पदार्थ खाणे उदा. भेळ , सामोसे, भजी, वडे, चिवडा, चहा, कॉफी, खूप गरम असताना अन्न खाणे, खूप धुम्रपान, मद्यपान,चिंच, दही असे आंबट पदार्थ अधिक खाणे,वेगवेगळ्याप्रकारची चटकदार लोणची खाणे,अधिक शीत पेय पिणे,ह्या सगळ्या पदार्थांच्या सेवनाने अमाशयाच्या श्लेष्मल त्वचेचा क्षोभ होतो. डोके दुखणे, अंग दुखणे अश्या कारणासाठी आपल्याच मनाच्या सवयी नुसार अयस्परिन हे औषध घेणे, आणि अशीच काही औषधे बराच काळ पर्यंत घेत राहणे.
२)– विहारजन्य  कारणे- – आपण ज्या ठिकाणी राहतो,वावरतो त्या ठीकाण चा आणि आपल्या आरोग्याचा घनिष्ट सबंध असतो. त्यामुळे औषधां पेक्षा कधी कधी डॉ.हवा पालट करायला सुद्धा सांगतात.कधी कधी कामधंदया निमित्त सारखे उन्हातान्हात हिंडावे लागते.कधी कधी रात्रीचे वेळी जागरण करावे लागते.कधी कधी मानसिक तणावा खाली काम करावे लागते.   तसेच-कौटुम्बिक कलह, आर्थिक विवंचना या मुळे तणावग्रस्त असणार्या व्यक्ती, मोठ्या जबाबदारीच्या पदावर असणारे अधिकारी ईत्यादी.

आम्लपित्त आणि उपचार

ज्यांच्या कानावर मोठमोठ्याने आवाज येत असतात. असे लोक, उदा. चित्रपट गृहातील डोअरकीपर नेहमी हाणामारीचे चित्रपट पाहणारी रसिक प्रेकक्षक, कामाच्या व्यापामुळे जेवणाची ठराविक वेळ नसून अवेळी जेवणारी व्यक्ती या कारणा व्यतिरिक्त वातावर्नांचा परिणाम म्हणून शरद ऋतून मध्ये निसर्गत: अनेकांना पित्ताचा त्रास होतो. त्याचे नेमके कारण काय ते पाहणे अत्यंत जरुरीचे असते. अन्नपचन होण्यासाठी आमाशया मध्ये  निसर्गत: पित्त पाझरत असते. ज्यावेळी या सर्व कारणांन मुळे  एक तर पित्त पाझरण्याचे प्रमाण वाढत किंवा पित्ताच्या स्वभाविक आम्लते मध्ये वाढ होऊन ते खूप जास्त प्रमाणात आंबट होते. आणि मग त्रासदायक लक्षणे दिसू लागतात. वाढलेले पित्त जेव्हा उलटी किंवा शौचांद्वारे बाहेर येते, त्यावेळी बरे वाटण्यास सुरवात होते. हा प्रकार बर्याच काळ पर्यंत तर अमाश्याच्या स्लेष्मल आवरणावर या पित्ताचा परिणाम होतो.  आणि त्या ठिकाणी जखम होते.म्हणूनसुरुवातीच्या काळातच पथ्य पाळून आणि औषधी घेऊन आरोग्य रक्षण करावे. याचे असे हि आहे काही जणांना वरील कारणापैकी अनेक स्ब्यी असूनही म्हणावा तसा त्रास होत नाही, तर काही जणांना थोडा छा जास्त झालला तरी सहन होत नाही. साधारण पणे कफ प्रकृती आणि वात प्रकृतीच्या व्यक्तींना  चटकदार पदार्थ खाण्या-पिण्याने काहीच फरक पडत नाही,पण पित्तप्रकृती व्यक्तींना मात्र ताबडतोब त्रासदायक ठरते. तेव्हा सगळयात महत्वाचे ठरते ते म्हणजे खाण्या पिण्याचे योग्य वेळेतच योग्य नियोजन करणे. सकाळी उठल्या बरोबर लवकरात लवकर पोटात काहीना काही ढकलणे आणि दोन खाण्यान मध्ये जास्त अंतर न ठेवणे. अशी पथ्य पाळली तर तुमचा अर्धा रोग नक्कीच कमी होईल. उठल्या-सुटल्या चहा ,सिगार, थंड पेय घेणे टाळावे. तसेच तुम्ही ओलोपथीची औषधे बरेच दिवस घेण्याने ईतर वाईट परिणाम सहज धडवून आणतात. आम्ल पित्ता साठी काही दिवस औषधी  घेणे जरुरीचे  आहे. ओलोंपथीमध्ये, अल्युमिनिंयम, क्यल्शियम मयग्नेशियम हि संयुगे असतात किंवा मिश्रणे असतात. म्हणून या मुळे अनेक विध परिणामसुद्धा होतात. अल्युमिनियम संयुगाने मलावरोध होतो. हि जास्तकाळ राहिल्यास मुळव्याधी होण्याची शक्यता असते. मेग्नेशिय्म संयुगाने जुलाब होतात. तसेच क्यल्शिय्म जास्त काळ घेत राहिल्यास शरीरातील क्यल्शिय्म जास्त प्रमाण वाढून ईतर किरकिरी चालू  होतात. म्यग्नेशिय्म संयुगाने  पोट्यशियम हळूहळू कमी होवून त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो.
ज्याना हृद्यविकार व यकृताची व्याधी असेल त्यांना या औषधातील सोडियम मुळे शरीरातील पाणी साचून राहून सूज येते. म्हणून दीर्घकाळ  वापरण्या साठी सुरक्षित,परिचयाची, आहार जन्य,आपल्या अंगात मुरण्यासाठी आयुर्वेदचिकित्सा वापरणे फायदेशीर ठरते.

आम्लपित्ता वरील चिकित्सा :

आम्लपित्ता साठी औषध्ये घ्यायची असल्यास सर्व प्रथम कोठा साफ ठेवणे आवश्यक आहे .रोग्याचे वय, शरीर प्रकृती, कोठा हलका आहे कि जड या वरून औषध ठरवावे. साधारण व्यक्तींना एक ग्लास पाण्या सोबत १/२ ते १ चहाचा चम्मच अविपत्तीकर चूर्ण, किंवा त्रिफळाचूर्ण घेण्याने कोठा साफ होतो. नाही झाला तर हेच चूर्ण दुसर्या दिवशी कोमट दुधामध्ये १/२ चमचा तूप मिसळून त्या सोबत घ्यावे. प्राथमिक अवस्थेत खाण्यापिण्याचे पथ्य व्यवस्थित पाळल्याने औषधांची गरज भासत नाही.

प्रवाळपंचामृत, गुळवेलसत्व, कामदुहा, सुवर्णसुतशेखर, जटामासीचूर्ण,माका, जेष्ठमध चूर्ण, माक्षिक भस्म यांचा प्रमाण बद्ध आणि रोग्यांच्या प्रकृतीनुसार अनुपानासमवतेचां उपयोग खूपच फायदेशीर ठरतो. आवळ्याचा मोरावळा, डाळींबाचा रस यांच्या उपयोगाने औषध घेण्याचा त्रास न वाटता आश्चर्यकारक सुधारणा होते. सुतशेखर १२५ मी. लि.ग्र्याम आणि चंद्रपुटी  प्रवाळभस्म १२५ मी.लि. ग्र्याम सकाळ, संध्याकाळ दाडीमारिष्टां सोबत घ्यावे. सकाळी उठल्या बरोबर आधी आमलकावलेह १/२,१ चमचा किंवा मोरावळा १/२ चमचा खावा.नेहमीच्या जेवणात आंबट, तिखट कमी असावें.चिंचेचा वापर करणे शक्यतोवर टाळावे. तसेच आंबवून बनवलेले पदार्थ कमी खावे. कमी पत्तीचा चहा घ्यावा.
नारळाचे पाणी, ओले खोबरे, केळी, आवळे, डाळिंब, पडवळ, कारले, मुग यांचा जास्त वापर करावा.आवळ्याच्या जास्तीत जास्त उपयोगाने अतिशय फायदा होतो. म्हणून कोणत्याही स्वरूपात आवळा वापरावा. ज्याना चूर्ण किंवा पातळ औषध् घेणे नकोसे वाटते. अस्यांनी शुक्तीन, अल्सरेक्स, बपसीड  अशी विश्रासार्ह कंपन्यांची प्यकस आणून त्यातील गोऴया वापराव्यात. आम्लपित्ताच्या काही रुग्णांची हात-पाय, डोळे जडजड होतात. अशी तक्रार असते, यांनी थंड पाण्यातून दिवसातून तीन वेळां दोन चमचे चंदनासव घ्यावे. आणि भरपूर पाणी प्यावे.

Source : Marathi Unlimited.

Get treatment on your acidity problems here, read full article.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
36
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu