आरोग्य मंत्र. (How to Get Rid of Tension Headaches)
आजकाल आपले आयुष्य बघितले कि आपण शरीराला क्षणभर हि उसंत न मिळू देण्याचे व्रत घेतले आहे कि काय असे वाटायला लागते. मनाला आणि शरीराला सुद्धा अगदी थकवून गार करून सोडतो. जो पर्यंत शरीराची सहन करण्याची ताकत असते. तो पर्यंत काहीच जाणवत नाही. पण एकदा का ही शक्ती संपलीकि दबा धरून बसलेले नानाविध रोग आपल्या भोवती फेराने नाचायला लागतात. आपण भाम्बाउन जातो व मन सुद्धा गोंधळून जातो. मग मात्र आपल्या जीवनात तणाव नावाची गोष्ट हळूहळू प्रवेश करू लागते. हा तणाव नंतर आपल्या संपूर्ण आयुष्याचाच ताबा घेऊ लागतो. आणि संपूर्ण जीवन या तणावा खाली येत.तणाव म्हणजे काय? / (What is Tension?)
आपण रबर ताणतो. म्हणजे नेमक काय करतो? रबर ताणले असता ते आपली स्थिती सोडून बाजूला सरकते. त्याला ‘डिस्प्लेसमेंट’ म्हणतात. तसच आपल्या शरीराच आणि मनाच होत असतं. तणावात आपण थोडे ‘सरकलेले’ असतो. आणि अश्या या सरकलेल्या अवस्थेत आपल्या हातून होणारी हि कृती देखील ‘सरकलेली’ असते. आपण घेतलेले निर्णय किंवा करीत असलेला विचार देखील योग्य स्थितीत नसतो. अश्या रीतीने आपल आयुष्यच सरकत जात असत. या सरकलेल्या आयुष्यात नवनवीन रोग उत्पन्न होतात ज्या रोगांनी आधीच ठाण मांडलेल असत. ते अधिकच तीव्र होतात. आपण औषध घेत नसतो. डॉ. चा सल्ला घेत नसतो व आरामही करीत नसतो. तरी प्रकृतीत कुठे तरी काही तरी बिघडलेले असत. पण आपल्याला तणावहि नको असतो त्यापासून आपल्याला मुक्तीपण हवी असते. पण ती मिळणार कशी?
काम कोणतेही असो आपली त्याबद्दल संपूर्ण तयारी झालेली असते. तरी देखील कुठलेही योग्य काम करण्या अगोदर मनाला थोडा आराम हवा असतो. त्या कामा बद्दल विचार करण्यास मनाला थोडी सवड हवी असते. ती आपण कधी देत नाही. आणि ऎन वेळी तणाव तयार होऊन सर्व काम विस्कळीत होऊ लागतात. तर नेमके काम करते वेळी जो तणाव निर्माण होतो. मन घाबरायला लागते. व होणार्या कामाची तयारी झाली असून हि त्या मनाला आपण आरामच देत नाही. सारखे रहाट गाडगे सुरूच ठेवणार तेच चुकीचे आहे. त्या करीता नेहमी एक काम झाले कि थोडे स्वस्थ राहून आराम करणे जरुरीचे असते. हा तणाव आपण आपल्या जीवनातून घालवायलाच पाहिजे. दिवसभर कामे हि करावीच लागतात. पण ती तणाव रहित मन:स्थिती ठेवून करावीत. असे कराल तर तुमचे शरीर तुम्हाला दीर्घ काळापर्यंत साथ देईल. जीवनाच्या मध्येच कुठेतरी तुमचा अवसानघात करणार नाही.
रोगांचेही तसेच आहे. तुम्ही सतत तणावा खाली राहणार आणि रोगांसाठी भरमसाठ औषधी घेत राहणार, औषधाने तुमचा तो विशिष्ट रोग दूर होईलही पण मागोमाग दुसरा आजार शरीरात प्रवेश करील. त्या साठी पुन्हा पुन्हा औषध्या घेवून् शरीरावर किती अत्याचार करणार?
तसे पाहिलेत तर आपल्या जीवनातील अनेक आजारांना आपणच दूर लोटू शकतो. फक्त त्याकरिता तज्ञ डॉ. रांचा सल्ला घेतला पाहिजे. तेच तुमच्या तणावा बद्दल सांगतील. तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे. या बाबत अचूक मार्गदर्शन करतील.जीवनात आरोग्यासाठी आनंदित व उत्साहित, चैतन्यमयी राहणे जरुरीचे आहे.Source : Marathi Unlimited.