स्त्री मुक्ती दिन ८ मार्च साजरा केला जातो. विचारांची व परंपरांची जी शृंखला आहे ती मोडणे म्हणजे मुक्ती होय. पुरुषांना व स्त्रियांना समान हक्क आहेत. पण ही समानतेची ‘मुक्ती’ आपणास फक्त कागदोपत्रीच दिसते. स्त्री ही जन्मापासून कुणाच्या तरी अधिकारात असते. ही स्त्री – पुरुषामधील असमानता नाहीशी करणे म्हणजेच स्त्री -मुक्ती. स्त्री सुशिक्षित झाली म्हणजे तिच्या बुद्धीला खाद्य मिळेल व ती समानतेसाठी भांडूही शकेल. त्याचप्रमाणे शिक्षणामुळे ती आर्थिकदृष्ट्याही स्वावलंबी बनेल. त्यातूनच स्वावलंबनाची भावना स्त्रीमध्ये जागृत होवून ती खंबीर बनण्यास मदत होईल . त्यामुळे स्त्री हि स्वतः मुक्ती घडवू शकेल . स्त्री वैचरिकदृष्ट्या ज्यावेळी स्वतंत्र होईल, खंबीर होईल, तीच खरी स्त्री -मुक्ती !
भारतीय कुटुंब : व्यवस्था ही भारतीय स्त्रीच्या त्यागावर आधारलेली आहे. पिढ्यानपिढ्या अपमान आणि दु:ख भोगून महिलांनी हि सहज – सुंदरता राखून ठेवली होती कुटुंबसंस्था अगदी. आवश्यकच आहे. परंतु तिने अन्याय केला तर तो स्त्रीने मुकाट्याने सहन करावा काय? समाजात अनेक उदाहरणे बघावयास मिळतात. कुठे दारू पिवून पत्नीचा शारीरिक, मानसिक, छळ करणारा नवरा, कुठे स्वतः द्विभार्या प्रतिबंधक कायदा असतांनाही दुसरी पत्नी करणारा नवरा ; तर कुठे स्वतः काहीही कष्ट न करता केवळ पत्नीच्या कामाईवर जगणारा ऐतखावू आणि तरीही पत्नीवर अधिकार गाजविणारा अहंकारी नवरा. अशी कितीतरी नवऱ्यांची रूपे बघावयास मिळतात . या सर्व पुरुषांना स्त्रीने केवळ त्याच्याशी तिचे जन्माचे नाते जोडले आहे म्हणून स्वीकारावे काय? व रडत रखडत आपल्या कर्माला दोष देत जगावे काय? नाही. या अन्यायाविरुद्ध सामना करण्यास जेंव्हा तिच्यामध्ये संकटाला समोर जाण्याची हिम्मत येईल, तेव्हाच खरी स्त्री – मुक्ती झाली असे आपण समजू . पती दुसरे लग्न करीत असेल तर पत्नी आपल्या पतीविरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत दाखवील तेव्हाच स्त्री -मुक्ती होयील आणि असे प्रकार जर काही प्रमाणात घडले तर दुसरे लग्न क्र्नारालाही खरी दहशत बसेल .
आज अनेक सुशिक्षित स्त्रिया फक्त स्वतः पुरता किंवा आजूबाजूला ज्या स्त्रिया स्वतंत्रपणे वावरतांना दिसतात त्यच्यापुरताच विचार करतांना दिसतात. आपण आजही स्वतंत्रपणे समाजात वावरू शकतो. त्यामुळे स्त्री – मुक्ती हवी कशाला असे त्यांना वाटते. अशांनी आपल्या भोवतीचा कोष तोडून इतरांचाही विचार करण्याचा प्रयत्न करावा. अनेक ग्रामीण स्त्रियांनी आज काय स्थिती आहे? दिवसभर काबाडकष्ट करायचे व शेवटी नवऱ्याची शिवीगाळ , मारपीट सहन करायची, अशिक्षित कशाला, कित्तेक सुशिक्षित स्त्रियांनासुद्धा हे सर्व शन करावे लागते . कित्तेकदा तर त्या आत्महत्या करतात.
स्त्री मुक्ती म्हणजे सुधारणा . परंतु या सुधारणाच्या मागे धावता धवता आपला तोल गमवायला नको. बरेचदा या चळवळीमध्ये थोडासा अतिरेकपणा जाणवतो. कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र हि आभूषणे नवऱ्याच्या गुलामगिरीची लक्षणे आहेत. असे चळवळीतील स्त्रिया मानतात . परंतु कुंकू व बांगड्या आपण लहानपणा पासूनच घालत असतो . शिवाय मंगळसूत्र हि आभूषणे नवऱ्याच्या गुलामगीरचे लक्षणे आहेत असे न मानता आपण त्याला प्रेमाचे बंधन ही माणू शकतो . त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सुंदर्यादृष्टी गमावणे व सामाजिक सुधारणा यांचा आग्रह धरणे या दोन गोष्टीतला फरक आपण आपण लक्षात घ्यायला हवा . त्यमुळे सुधारणा हीच की पती निधनानंतर देखील आपण स्त्रियांना कुंकू लावण्याचा , मंगळसूत्र घालण्याचा आग्रह धरायला हवा . विधवांनी हळदी कुंकू समारंभास आमंत्रित करावे. इतरांपेक्षा त्या वेगळ्या आहेत असे त्यांना भासवू देवू नये. मंगळसूत्र हे खरोखरच सौभग्यचिन्ह असेल तर मृत पतीच्या आठवणीसाठी ते सौभग्यचिन्ह वापरणे गैर का मानावे ? स्त्री मुक्ती म्हणजे स्वैराचार नव्हे, आजकाल सुशिक्षित , स्वतंत्र स्त्रियांची मोठमोठ्या पदावर असलेल्या सुशिक्षित , स्वतंत्र स्त्रीयासाठी मोठ्मोठ्या पदावर असलेल्या सुशिक्षित विवाहित पुरुषांनी लग्न करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. स्त्रियांचा सुरळीत असलेला संसार उध्वस्त करणाऱ्या या स्त्रियांना स्त्री – मुक्तीच्या शिखरावर बसवायचे का?
त्यांनी कितीही या शिखराखाली आश्रय घेण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यांचा स्वीराचारच ठरेल. आजकाल आवडीनिवडींचे, राहणीचे , कपड्यांचे भान राहिले नाही . स्वातंत्र्याच्या आधारावर , वाट्टेल तसे घट्ट , पारदर्शक कपडे घालून पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करणे हे तरुणीचे जर ध्येय आहे, तर केवळ पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करणे हे तरुणीचे जर ध्येय आहे, तर केवळ पुरुषांना दोष का द्यावा? एकीकडे आपणच स्त्री – मुक्तीचा घोषणा घ्यायच्या आणि दुसरीकडे आपणच पुरुषांच्या हातातील बाहुले बनण्याचा प्रयत्न करायचा . हे परस्परविरोधी नाही काय? अर्थात, या काही अपवादात्मक गोष्टी, पण त्या टाळायला हव्या.
थोडक्यात, स्त्री – मुक्ती म्हणजे स्वातंत्र्याचा दुरुपयोग , कुटुंबसंस्थेला तडा नव्हे, स्त्री व पुरुष हि संसाररुपी रथाची दोन समान चाके आहेत. ज्या रस्त्यावर हा रथ चालवायचा, तो रस्ता काही नियतीने अगदी गुळगुळीत करून ठेवलेला नसतो. रस्त्यावर खाचाखळगे असणारच . संसाराचे देखिल तसेच आहे. परस्परांच्या सामंजस्यातून हासंसाररथ चालवावा लागतो. त्याकरिता दोघांनीही त्याग करयला हवा. केवळ स्त्रीला त्यागाची, सहनशीलतेची मूर्ती बनवू नये. स्त्री – मुक्ती म्हणजे स्वतः चे व्यक्तिमत्व विकसित करण्याचा हक्क प्राप्त करणे होय.
Source : Marathi Unlimited.
2 Comments. Leave new
Thanks for sharing on women day.
This is nice website .
khupach sundar lekh ahe. dhanyavad.