शिराळा कोर्टाने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जामीन मंजूर केला आहे. फक्त रुपये 15 हजार रूपयांच्या बंधनकारक रकमेवर राज यांनी जामीन देण्यात आला आहे. शिराळा कोर्टामध्ये राज ठाकरे विरोधात सुरु तंटे वरून हा जामीन मंजूर केला आहे, राज ठाकरे यांचावर आरोप आहे की त्यांनी जमावबंदी तोडली होती. 2008 साली राज ठाकरेंना अटक केल्यानंतर शेडगेवाडी इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळ इत्यादी केली होती. याच संदर्भात शिराळ्यातल्या न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी राज ठाकरे शिराळा येथे दाखल झाले होते. आणि आता त्यांचा जामीन सुद्धा मंजूर केला आहे.
Source : Marathi Unlimited.