Chatrapati Shri Shivaji Maharaj, Chhatrapati Shivaji is Maharashtra’s most popular leader. He was born at Shivneri in 1630. His mother, Jijabai ..read full essay in Marathi language.
हिंदू साम्राज्य ( देश क्रांती)
छत्रपती श्री शिवाजी महाराज !
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.त्यांनी पारतंत्र्यातून स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते. पवित्र गंगेचा उगम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टीने ल्काहात घेण्या सारखे नाही कां ? तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आरंभी महाराष्ट्राच्या परतंत्रे विषयीचा विरोध प्रगट करून स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नान पुरता मर्यादित वाटला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटली त्यामुळेच पुढे भारतात द्क्षिणोत्तर ती प्रेरणा निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. त्यांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवराव या निजामशाहीतील शूर सरदाराची मुलगी तर वडील शहाजीराजे भोसले हे स्वकर्तुत्वाने सामर्थवान बनलेल्या मालोजीराव भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या व स्वातंत्र्याचा उन्मेष बाळगणार्या माता -पित्याच्या पोटी शिवाजीचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० या वर्षी वैशाख शुद्ध द्वितीयेस जुन्नर जवळ शिवनेरी या किल्ल्यावर झाला.
तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी सत्ता संप्विनार्या परधर्मी परकीय सत्ताधीशांनी महाराष्ट्रावर पुढे दोन तीनशे वर्षे सत्ता गाजविली. जसजशी त्यांची सत्ता मजबूत होत गेली तसतशी त्यांच्यातली जुलमी प्रवृत्ती वाढीला लागली. आपल्या प्रजेवर अन्यायाचे कर लादणे, त्यांची घरेदारे आणि जमिनी ब्ल्काव्ने, स्त्रियांची अब्रू लुटणे, आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे. असे प्रकार सुरु झाले. सारी मराठी माण या जुलसेमी सत्तेवर रागावली होती. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशी अवस्था झाली होती.
स्वदेश स्वतंत्र व्हावा हि माता-पित्याची ईच्छा शिवाजींनी पूर्ण केली. हिंदू धर्माचा पाडाव करून सर्व हिंदुस्थान मुसलमानमय करून टाकावा या म्ह्त्वाकांक्षेने झपाटलेला औरंगजेब हा दिल्लीच्या तख्तावर होता.विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही अस्या वेढ्यात सापडलेला पुणे-सुपे परिसर या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबांची हुकुमत होती. तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा व सैन्य पाठवत होता. माता जिजाउ न्नि शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तींचा विरोध आणि चीड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयीच्या निष्ठा निर्माण केल्या. शिवाजी राज्यांच्या अंगभूत गुणांचा विकास केला. आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले. मराठी माणसाच्या मनातील रागाला नेमकी दिशा दाखविण्यासाठी ‘मराठा तितुका मेळवावा’ हे सूत्रे धरून स्वातंत्र्य प्रेमी, व पराक्रमी, माणसांना एकत्रित केले. यावेळी त्यांच्या लक्षात आले कि काही मराठी माणसे सरदारकी-जहागिरी आणखी मोठ्या हुद्यासाठी परक्या सत्ता धीश्यांच्या चाकरीत धन्यता मानून शिवाजी राज्याच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत आहेत.
औरंगजेब हा जबरजस्त लष्करी सामर्थ्याचा पराक्रमी, कट्टर मुसलमानपंथीय व दक्षिणेतील राजकारणी माहिती असलेला बादशहा हता. पण शिवाजीने अफझलखाना सारख्या पराक्रमी मुसलमान सरदाराला यमसदनी पाठविल्या नंतर तो जिवंत असे पर्यंत महाराष्ट्रात येण्याची त्याची छाती झाली नाही. औरंगजेबाने शिवाजीरायांना पकडून आग्रा येथे ठेवले. पण तेथुही ते शिताफीने निसटले. तेव्हा औरंगजेबाने धसकाच घेतला.
शिवाजीला लढाईचे राज्य कारभाराचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले.दहा-बारा वर्षाचा असतानाच शिवाजींच्या मनात स्वातंत्र्याचे वारे खेळू लागले. माझा देश मोगलांच्या आणि मुसलमानांच्या गुलामीतून मुक्त करायचा. माझ्या बांधवांना गुलामीतून व छळातून मुक्त करायचेच! हाच उद्देश ठेवून त्यांनी सह्यांन्द्रिच्या कडेकपारीत भटकून सवंगडी ग्ला केले. तानाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी, येसाजी आणि एकांपेक्षा ऐक जिवाला जीव देणारे मित्र गोळा केले. श्री रोहिडेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. आणि एका स्वरांत घोषणा दिली. ” हर हर महादेव” महाराष्ट्रातल्या मावळखोर्यानपासून त्यांनी आपल्या प्रयत्नांना आरंभ केला. साम-दंड-भेद यांचा उपयोग करत वयाच्या स्लाव्या वर्षी शिवाजींनी ‘तोरणागड’जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. आणि मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. एका मागून एक गड आणि किल्ले जिंकून घेतले. युद्धात शक्तीपेक्षा युक्तीचा वापर जास्त केला. राक्षसी देहाचा अफझलखान भेटीचे ढोंग करून शिवाजीचा घात करायला आला होता. प्रतापगडावर भेट ठरली. मिठी मारण्याचे सोंग करून त्याने शिवाजीवर तलवार चालवली. पण शिवाजी सावध होताच. हातात लपवलेल्या वाघनखांनी अफझलखानचा कोथडाच काढला. पळून गेला म्हणून शाहिस्तेखान वाचला. शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करतांना येणाऱ्या प्रत्तेक संकटांला धीराने सामोरे गेलेच. पण त्यांचे सवंगडीही त्यांना समर्थ साथ देत होते. सिंहगड घेतांना तानाजी पडला . खिंड लढवितांना बाजीप्रभुणे छातीचा कोट केला . मुरारबाजी महाडकर, प्रतापराव गुजर अशा एकाहून एक शूर सवंगड्यानी आपल रक्त दिले. आपले प्राण दिले . स्वराज्य अकराला आले. स्वराज्यात आता चोऱ्याऐंशी किल्ले आणि दोनशे चाळीस गड होते .
लोकांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याचा आग्रह केला. महाराजांनी आपल्या मातेशी आणि जवळच्या सरदारांशी चर्चा करून राज्यभिषेक करवून घ्यायचा असे ठरवले. काशीचे प्रसिद्ध पंडित गागाभट्ट धार्मिक विधी करण्यासाठी आले. स्वराज्याची राजधानी रायगड ठरली. हिंदवी स्वराज्याचा राजा सिंहासनाव्रर बसला. लोकांनी जयजयकार केला. “क्षत्रिय कुलावतंस गोब्राम्हण प्रतिपालक हिंदू पतपातशहा छत्रपती श्री शिवजी महाराज की जय ” शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश, देश आणि धर्म यासाठी वेचले. संत तुकाराम हे त्याचे अध्यात्मिक गुरु होते. तर संत रामदास हे त्याचे राजकीय गुरु होते. शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक ६ जून, १६७४ साली रायगडावर साला. त्यानंतर थोड्याच काळात म्हणजे ६ वर्षानंतर ३ एप्रिल, १६८० मध्ये शिवाजी महाराजांचे निधन झाले. रामदासांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले.
“निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।
4 Comments. Leave new
I came to your Chatrapati Shri Shivaji Maharaj page and noticed you could have a lot more traffic.
realy nice
Lodhevali
Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.