Various food recipes of Bitter Gourd.
Bitter though it is, karela has a unique taste that transforms it into a delicacy if prepared in the right ways. Bitter gourd is family friendly recipe
कारले कितीही कडू असले तरी त्यांचे खाणे तितकेच महत्वाचे आहे. एक म्हण आहे ”कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले तरी कडूच कडू ” तरीहि तर्हे तर्हेने बनवून ते खाल्लेच पाहिजेत.
चिंच गुळाची कारली :
साहित्य- एक पाव कारली, प्रत्येकी दोन चमचे दाण्याचा कूट, तिळ, खसखस पूड, ओल्या नारळाचा चव, प्रत्यकी एक चमचा धने, जिरेपूड व गोडा मसाला, चवीनुसार तिखट -मीठ थोडा चिंचेचा कोळ, गुळाचा एक इंच खडा, कोथिंबीर, तेल, मोहरी, हळद हिंग.
कृती – कारल्याच्या चकत्या करा. त्याला मीठ चोळून कापडात गुंडाळून त्यावर वजन मांडून ठेवा. कारल्यांना पाणी असेल ते काढून टाका.चकत्या स्वच्छ धुवून घ्या. कढईत तेलाची फोडणी करून त्यात सर्व जिन्नस घालून शिजू द्या. नंतर चकत्या घालून किंचित पाणी घालून भाजी शिजू द्या.ठेचलेली कारली :
साहित्य: एक पाव कारली, दोन कांदे , चवी नुसार तिखट,मीठ प्रत्यकी एक चमचा जिरे, धने पूड. पंजाबी पद्धतीचा मसाला. एक चमचा लिंबाचा रस तेल, मोहरी हळद व हिंग.
कृती– कारली चिरून भांड्यात ठेचून घ्या. त्याना मिठात चांगले घोळून त्याचे पाणी पिळून काढा. कांदे बारीक चिरून घ्या.व नंतर कार्ल्याचा चोछा स्व्च्छ धूवुन निथळून घ्या, कढईत जरा जास्त तेल घालून फोडणी तयार करा. त्यात कांदा घालून लालसर होई स्तोवर परता नंतर तीखट मीठ चवी नुसार धने, जिरे पूड, मसाला वै. घाला फोडनी शिजल्या न्नतर कारले चोथां घाला व मंदाग्नी वर शिजू द्या. भाजी शिजल्या नंतर शेवटी लिंबाचा रस घाला, कोथिम्बिर घाला.डाळ कारले : वरील प्रमाणेच पण बिजलेली चना डाळ मिश्रित कारलेचोथा भाजी बनवा. अजिबात कडू लागत नाही. त्यात थोडे खोबरे किसाचा वापर करावा.
भरली कारली :
साहित्य: एक पाव एकसारखी कारली, दोन मोठे कांदे, दोन चमचे हिरवी मिरची वाटलेली, अएक चमचा आले-लसून पेष्ट, एक चमचा आमचूर पावडर, एक चमचा बडीशेप पावडर, चवीनुसार तिखट-मीठ, हळद, तेल, पक्का दोरा, एक चमचा धने पावडर.
कृती: कार्ल्या वरची ख्ब्दीत टोके सुरीने थोडी थोडी काढून टाका, कारल्याच्या मधोमध उभा कापदेवून त्यात मीठ भरा. एक, दोन तास तशीच ठेवा. पाणी सुटल्या नंतर ते काढून टाका. बिया जास्त जाड असतील तर त्याही काढून टाका. नंतर दोन तीन पाण्यात धुवून टाका. कापडाने कोरडी करा. कढईत तेल गरम करून त्यात कारली थोडी तळून घ्या. कांदा अगदी बारीक चिरा, कढईत तेल घालून कांदा परतून घ्या. आले-लसून पेष्ट टाका, त्यात आमचूर पावडर, बडीशेप पावडर, धने पावडर, तिखट-मीठ, फोडणी करून शिजवून घ्या. हा मसाला पूर्णपणे थंड झाल्यावर कारल्यान मध्ये भरा. दोर्याने कारली बांधून घ्या. भांड्यात हि कारली तेलात परत परतून घ्या. शिजली कि थंड झाल्यावर त्याचा दोरा काढू टाका. त्याबर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका व भाकरी सोबत खाण्यास द्या. हि भाजी–भाकरी आपण प्रवासाला नेऊ शकतो.हि भाजी दोन, तीन दिवस टिकू शकते.Source : Marathi Unlimited.