बटाटे दहीवडा !




Batata Dahi Vada : unique way of recipes, Its very spicy and tasty recipe. Follow this step by step photo recipe to learn how you can make this yummy Dahi Vada. Read all Indian recipes.

Batata Dahi Vada

साहित्य: दीड वाटी उडदाची डाळ, एक पाव बटाटे, पाच हिरव्या मीरच्या, आल्याचा तुकडा, मीठ, कोथिंबीर. चार ते पाच वाट्या दही , एक वाटी ओले खोबरे, चार वाटलेल्या मिरच्या एक चमचा जिरे पुड व मीठ.

कृती: उडदाची डाळ प्रथमच तीन ते चार तास भिजत टाकावी. नंतर उपसून थोडी सुकवुन वाटावी, बटाटे उकडून सोलून किसून घ्यावे. वाटलेली डाळ, किसलेले बटाटे, चवी पुरते मीठ, बारीक कोथिंबीर, वाटलेले आले, मिरच्या एकत्र करावे. त्याचे छोटे गोळे करावे. व मध्य भागी छिद्र करावे. नंतर गरम तेलात तळून घ्यावे. दह्या मध्ये वाटलेल्या मिरच्या, ओले खोबरे, मिरे पूड व मीठ घालून कालवावे. (मिक्स करावे) त्यात तळलेले वडे दह्यात घालून ठेवावे. व सर्व्ह करावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड