जनलोकपालचे जनक समाजसेवक श्री आण्णा हजारे समाज परिवर्तनासाठी “जनतंत्र मोर्चा ” नावाची नवीन बिगरराजकीय संघटना स्तापन करणार आहेत . आज महात्मा गांधी पुण्यातिथी दिनी पाटण्यात आयोजित सभेत त्यांनी हि घोषणा केली.अण्णा हजारे गेल्या दोन वर्षापासून जनलोकपालसाठी लढा देत आहेत. पण त्यावर आज पर्यंत केंद्र सरकारने गंभीरपणे विचार केलेला नाही. कडक जनलोकपाल आणा ,नाहीतर सत्ता सोडा, असा निर्वाणीचा इशाराच या वेळी अण्णांनी सरकारला दिला आहे.देशातील जनतेला संघटीत करण्यासाठी पुढील महिन्यात ते चार राज्यांचा दौरा करणार आहेत. व नंतर ते संपूर्ण देश पिंजून काढणार आहेत. सरकारने जर कडक कायदा निर्माण केला नाही तर त्यांनी पुन्हा आंदोलन उभे करण्याचा गंभीर इशाराच सरकारला दिला आहे .
Source : Marathi Unlimited