मौनी अमावस्ये निमित्य गंगास्नान करून घरी परतीसाठी रेल्वेत गर्दी करू पाहणाऱ्या २५ भाविकांनी चेंगराचेंगरीत प्राण गमावे लागले. अनेक जण जखमी झाले. रेल्वेस्थानावर एकच गोंधळ, जीवाच्या एकांतात धावपळ आणि नंतर पडलेल्या मृतदेहांचा खच असे दृश्य दिसत होते. अनेकांनी ताटातुट झाली ती कायमची. नातेवाइकानी फोडलेल्या हंबरडा. जीव हेलावून टाकणारा दृश्य. मृतांची संख्या आणखी वाढण्याचे शक्यता आहे.
कुंभमेळ्यात सुमारे तीन कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले. गंगास्नानानंतर संध्याकाळी आपापल्या गावी परतण्यासाठी रेल्वे स्टेशनवर भाविकांची एकच गर्दीच उसळली. रेल्वे स्थानावर पाय ठेवायचीही जागा नव्हती . सायंकाळी ७ च्या दरम्यान रेल्वेस्थानावरील पुलाचा कटडा तुटल्यामुळे अनेक भाविक एकमेकांवर पडले . जखमींवर स्वरूप राणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत . मृत व जखमींमध्ये महिला मोठ्या प्रमाणात आहेत .
Source : Marathi Unlimited.