संसदेवर २००१ ( Year 2001) साली झालेल्या हल्ल्यातील दोषी दहशतवादी अफझल गुरू (Afzal Guru ) याला शनिवारी सकाळी ८ वाजता दिल्लीतील तिहार तुरुंगात ( Delhi’s Tihar Jail ) अत्यंत गोपनीयतेने फाशी देण्यात आली. केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग ( Kendriy Grihasachiv R. k. Singh ) यांनी शनिवारी सकाळी अफझलच्या फाशीच्या वृत्ताला दुजोरा दिला. संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सुरक्षा रक्षकांनी पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. पण हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता. अफजल गुरूला दिल्लीतील तिहारमधील तिसऱ्या नंबरच्या जेलमध्ये लटकवण्यात आले ( hanged at Delhi’s Tihar Jail ) . दरम्यान, गुरूला फाशी देण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये हाय अलर्ट ( Jammu and Kashmir at High alert ) जारी करण्यात आला असून तेथील सुरक्षा वाढविण्यात आलीय. फाशीचा निर्णय घेण्यापूर्वी दोन दिवसआधी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ( President Pranav Mukharjee ) यांनी अफजलचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यामुळे अफजलच्या फाशीचा निर्णय तात्काळ घेण्यात आला.
Source : Marathi Unlimited