..तर देश सोडून जाईन
Kamal’s Emotional Speech About Viswaroopam
“विश्वरुपम” या चित्रपटावरून सुरु झालेल्या वादामुळे अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक कमल हसन कमालीचे व्यथित झाले आहे. या प्रकरणात मी अतिशय वायीट राजकारणाला बळी पडलो आहे, या चित्रपटासाठी मी माझे घर गाहन ठेवले आहे. देशात एकही धर्मनिरपेक्षक राज्य सापडले नाही, तर मी देश सोडून जाण्याशिवाय मला पर्याय राहणार नाही. यापूर्वी हि वेळ एम. एफ हुसेन यांच्यावर आली होती, आता हसनवर ही वेळ आली आहे, असा निर्वाणीचा इशारा कमल हसन यांनी दिला आहे. ‘विश्वरुपम” ला होत असलेला विरोध अनाकलनीचा असून त्या विरोधात मी लढा देवून आता दमलो आहे. असेही भाववश कमल हसन यांनी म्हटले आहे. या चित्रपटात कमल हसन हे मुख्य भूमिकेत आहेत आणि तमिळनाडू सरकारने या चित्रपटाला बंदी घातली आहे.
Source : Marathi Unlimited.