Self Reading Tips:
मनोलय मनाला स्थिर करण्यासाठी चोवीस तासातून एकतरी तास प्रात:काळी किंवा संध्याकाळी दररोज नित्यनेमाने निवांत, प्रशस्त हुद्याल्हाद्कारक; सात्विक भावनोत्पाद्क असें घरांतील एखादे स्वतंत्र व सोईस्कर, स्वच्छ ‘तळघर’, अथवा ‘खोली’, अश्या ठीकाणी शुचीर्भूत जागा पाहून व शुचिर्भूत होवून, सुगंधीत अगरबत्ती लावून ‘सहजासनावर’ तटस्त बसून डोळे मिटून ‘त्रिकुटाच्या’ ठायी (दोन्ही भुवयांमध्ये) लक्ष ठेऊन एकाग्र चित्तानें सोहं जप करावा. जप करीत असताना जड इंन्द्रीयांचे बाह्य कार्य बंद पडून फक्त मनाचेंच आंत कार्य सुरु होऊन अनेक ‘वृत्ती’ उठतात. हे तर नवीन अभ्यास करणार्याच्या तर लवकरच लक्षात येईल. सोहं जप जसजसा वाढत जातो. तसतश्या मनोवृत्ती स्थिर होत जाईल. जप चालू असताना मनाची एकाग्रता होऊ लागली म्हणजे नाना प्रकारची अद्भुत दृश्ये कधी जागृतीत तर कधी स्वप्नात दिसून अलौकिक दैवी चमत्कार होऊ लागतात हीच ‘स्थितप्रज्ञता’ यांस ‘मनोलय’ म्हणतात. मनोलय झाला म्हणजे मनाची बाह्य घांव बंद होऊन अंर्त-गुहात त्रिकुटाच्या व द्श्वेद्वारी मन लीन होते. उदा. म्हणजे जसे कापुराचा अग्नीशी संयोग झाला म्हणजे कापुराची कापूर हि अवस्था राहात नाही, तो अग्नी रूप बनतो.तसेच मिठाचा जलासी संयोग झाला म्हणजे त जलरूप बनतो.तद्वत मनाचा ‘दशवेद्वारी’ ‘ सोहं’ ‘ ज्योतिर्ब्रम्ह’ स्वरूपात लय होतो.
” देहातील पवित्र नद्या ” — डाव्या नासिका पुडांत इडा नाडी वाहते, तिला- गंगा नदी म्हणतात. उजव्या नासिकापुडांत पिंगला नाडी वाहते तिला- ‘यमुना’ नदी म्हणतात. दोन्ही नासिकापुडांत समान वायू वाहतो त्यास- सरस्वती नदी म्हणतात, डाव्या करणार गांधारी नाडी वाहते तिला- कावेरीनदी म्हणतात, उजव्या करणात हस्तिनी नदी वाहते तिला – सिंधू नदी म्हणतात, जिव्हाग्रांत– सरस्वती नाडी वाहते तिला- कृष्णा नदी म्हणतात, डाव्या नेत्रांत -चक्षुषा नाडी वाहते तिला- पूर्णा नदी म्हणतात, उजव्या नेत्रांत- अलंबुशां नाडी वाहते तिला- गौतम नदी म्हणतात, गुदा मध्ये कुहु नाडी वाहते तिला नर्मदा नदी म्हणतात, मुत्रेन्द्रिया मध्ये शंखिनी नाडी वाहते तिला- तापी नदी म्हणतात.
Source : Marathi Unlimited.