Rawa Idali , Tamil-Nadu Special.
Rava idli gets made at home when we want some quick and easy idlis. It is one of the simple recipe which combines the goodness of many dals and spices. Here you can find the procedure of making Rawa Idali.
साहित्य –: एक कप रवा (बारीक) एक कप शेवया, एक गाजर, एक लहान बिट, १/२ वाटी सोललेला हिरवा वाटाणा, १/२ वाटी फरस बी, २, ३ हिरव्या मिरच्या, थोडी मोहरी, एक चमचा उडीद दाल, एक चमचा चना डाळ, २, ३ लाल मिरच्या, ५, ६ काजू, एक चमचा बेदाणा, कढीनिंबाची पाने, कापलेली कोथिंबिर, मीठ, दोन चमचे खोबरेल तेल, तीन कप दही, एक चमचा तूप, केळीची पानें.
कृती –: दोन चमचे तुप गरम करून त्यात शेवया तांबूस परतवून घ्याव्या. उरलेल्या तुपातून रवा थोडा भाजून घ्यावा. गाजर, बित किसून घ्यावा. फरसबी अगदी बारीक कापावी. उरलेले तेल, तूप गरम करून त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली कि उडीद डाळ व चणाडाळ घालून परतावी . त्यात मिरची, कढीलिंब घालावा. काजूचे तुकडे व बेदाणा घालून दोन मिनटे परतून खाली काढावे. हे सर्व दह्यात घालावे. हिरवी मिरची बारीक कापून घालावी. सर्व कापलेल्या भाज्या व वाटाणा दह्यात घालून मीठ घालून सर्व ढवळून नेहमीच्या इडलीप्रमाणे मिश्रण तयार करावे . इडलीच्या साच्यातील वाट्यांमध्ये तूप लावलेले केळीच्या पानाचे तुकडे घालावे. त्यावर इडलीचे मिश्रण थोडे थोडे घालून नेहमीप्रमाणे इडल्या वाफवून काढाव्या. गरम इडली हिरव्या चटणीबरोबर खाण्यास घावी. तांदूळ व्यर्ज असलेल्या मधुमेहासारख्या व्याधी असलेल्या लोकांना या इडल्या खत येतील.