शाहरुख खान याने दिलेल्या एक मुलाखतीत म्हटले कि मला भारतीय असल्याचा गर्व आहे, आणि मी माझ्या देशात पुर्णपणे सुरक्षित आहे, या देशातून मला खूप प्रेम मिळाले आहे आणि तसेच मला या देशावर सुद्धा खूप प्रेम आहे. मी काय बोललो हे समजून घ्या आणि त्या वर काही चुकीचे पर्याय काढू नका. मी जे म्हटले ते निट लक्षात घ्या. काय वाचले आणि काहीही समजून हा वाद विनाकारण घातला जात आहे अशी सणसणीत चपराक अभिनेता शाहरूख खानने पाकच्या गृहमंत्र्यांना आणि दहशतवादी हाफीज सईदला लगावली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या वादावर शाहरूख खानने दिलेली हि प्रतिक्रिया आहे. एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुख सामील झाला होता. आणि लिखित स्वरुपात त्याने आपले भाषण दिले. त्या वेळेस शाहरुख खान याने आपल्या देशा बद्दला फार स्तुती केली होती. यावेळी त्यांने त्याच्याबद्दल निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. मी कुठेही म्हटले नव्हते की मला भीती वाटते आहे. जे जे लोक माझ्याबद्दल बोलत आहेत आणि माझ्या वर टीका करत आहेत त्यांनी सुरूवातील लेख वाचावा आणि मग बोलावे. मी माझ्या देशात सुरक्षित आहे. मला माझा देशामध्ये फार सुरक्षित वाटते. मी माझ्या देशात सुरक्षित नसल्याचे म्हटले नाही कि त्यामुळे माझ्या देशवासीयांच्या भावना दुखावतील , माझ्या लेखाचा विपर्यास करून मांडला जात आहे. हे होऊ नये अशी शाहरुख खानची आशा आहे, असे त्याने म्हटले आहे.
Source : Marathi Unlimited.