Palak Mutton :
Palak mutton is a non-veg dish prepared in spinach. Spinach as we know is good source of calcium and iron and is mixed with mutton which not only gives it a different taste but it is also suitable for those who like to eat mutton but don’t like the smell of it.
साहित्य-: अर्धा किलो मटण, पाव किलो पालक, दोन मोठे कांदे, ६ ते ७ लसून पाकळ्या, १ ईंच आले, १ ईंच खोबरे, कच्चा मसाला, मटण मसाला एक चमचा (पावडर) तिखट मीठ चवी नुसार, हळद, कोथिंबीर, १/२ लिंबू, (नेहमी प्रमाणे मटन मसाला वै) अर्धा किलो, मटन तर पाव किलो पालक याप्रमाणे. मटन कुकरमध्ये किंचित हळद घालून उकळून घ्यावे, पालक कापून मिक्सर मध्ये लिक्विड करून घ्यावी. संपूर्ण मसाले कांदा तेलावर भाजून घ्यावे. यांची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यावी. एक कांदा व कोथिंबीर बारीक कापावी, एक कांदा मसाल्यात टाकावा.
कृती :-
प्रथम गरम तेलात बारीक कांदा व बारीक चिरलेली कोथिम्बिर टाकावी नंतर मसाला पेस्ट टाकावी, फोडणीत मसाला होऊ द्यावा,लिंबू रस पिळावा. फोडणी शिजल्या नंतर चवी नुसार तिखट, मीठ, १/२ चमचा हळद टाकावी, लालसर शिजू द्यावी. शिजल्या नंतर पालक पेस्ट टाकून शिजवावी, त्यानंतर मटण टाकावे. ते चागले शिजू द्यावे नंतर बाकी कोथिम्बिर टाकावी व मटन मसाला पावडर टाकावी थोडे उकळू द्यावे आवडी नुसार रस्सा ठेवावा, या प्रमाणे पालक मटण तयार होईल. हि भाजी फार स्वादिष्ट वाटते व पचायला हलकी होते.Source : Marathi Unlimited.