Palak Andakari :
Palak anda / spinach egg curry recipe is an Indian style curry of boiled eggs in a spinach gravy. It’s a non-vegetarian dish. You can find more egg recipes here.
साहित्य–: दिड पाव पालक भाजी, चार अंडे, चार हिरव्या मिरच्या, दोन कांदा, चार पाकळ्या लसून,१/२ ईंच आले, एक चमचा जिरे, १/२ लिंबू, कोथिंबीर, तेल, मोहरी एक चमचा.
कृती–: अंडी उकडून घ्यावी, त्याचे साल काढून, थोडे तेल गरम करून अंडी त्यात परतावी, वरचे कवच लाल सर होऊन कवचाला फोपंडे येईल, ते बाजूला ठेवून जिरे, आले, लसून, कांदा तेलात परतून मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी, पालक स्व्च्छ करून बारीक कापावी व वाफवून घ्यावी, मिक्सर मधून काढावी. एक कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्याव. फोडणीसाठी मोठे दोन चमच्च तेल टाकावे, एकदम गरम झाल्यावर, मोहरी टाकावी, त्यानंतर कांदे लसणाची पेस्ट टाकून लालसर भाजावी, त्यातच थोडी बारीक कोथिंबीर गरम तेलातच टाकावी, हिरवी मिरची चे तुकडे नंतर १/२ चमचा हळद , चवी नुसार तिखट, मीठ टाकून फोडणी चांगली शिजू द्यावी, नंतर पालक टाकावी, भांड्यावर झाकण ठेऊन शिजू द्यावी, थोडे पाणी घालावे, बुडाला भाजी लागू नये म्हणून लक्ष करावे, जास्त घट्ट करू नये, त्यात लिंबाचा रस पिळावा. काही वेळात भाजी शिजल्या नंतर त्यात अंडी टाकावी, थोडावेळ भाजीत अंडी टाकून पाहिजे तेवढाच रस्सा ठेवावा. दोन मिनिटे ठेवून बारीक चिरलेली बाकी कोथिंबीर टाकावी.हवे असल्यास १/२ चमचा मटन मसाला टाकावा. साध्या अंडाकरी पेक्षा पालक अंडाकरी स्वादिष्ट वाटते.
Source : Marathi Unlimited.