आपण ज्या लोकलला मुंबईची लाईफलाईन असे म्हणतो अश्या लोकाल मुळे वर्षभरातर तब्बल ७५१ (751) प्रवाशांसाठी जीवघेणी ठरली. ठाणे यार्डासाठी मध्य रेल्वेने दोन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेतल्याने त्यानंतर झालेल्या गर्दीमुळे पाच प्रवाशांचा बळी गेल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकाल मध्ये सुरक्षेचे फार वांदे होत आहे. पण करणार तरी काय मुंबई मध्ये लोकल शिवाय गत्यंतर नाही. संपूर्ण मुंबई मध्ये दिवसेन दिवस गर्दी वाढतेच आहे. यात सुरक्ष्या व्यवस्ता तरी काय करणार. २0१२ मध्ये मध्य रेल्वे मार्गावरील लोकलमधून ५0५ तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमधून २४६ प्रवाशांचा पडून मृत्यू झाला. या दोन्ही मार्गावर १ हजार ७९१ प्रवासी जखमी झाले. नुकत्याच झालेल्या एका अपघातातात लोकल ने दोघांना चिरडले आहे. रेल्वे रुळावरून पायी जाणार्या दोन भावांना मालगाडीचा धक्का लागल्याने त्यांचा सोमवारी सायंकाळी मृत्यु झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या विपरीत आणी चुकीच्या अपघातांना कोण कारणीभूत? मात्र लोकाल मधल्या सुविधा आता वाढवायला हव्यात . त्यामुळे कदाचित ह्या दुर्घटना टळतील .
Source :Marathi Unlimited