Methi Puri.
I love this crisp methi puris and they are very easy to prepare too it just take 10-15 minutes with fenugreek leaves, red chilli powder, salt as per test and other ingredients.
साहित्य -: दीड पाव मेथी भाजी, १/२ वाटी ज्वारीचे पीठ, पाव वाटी कणिक, पाव वाटी बेसन, ५ हिरव्या मिर्च्या,५ पाकळ्या लसून, २ चमचे तीळ, दही, १/२ वाटी, तिखट, मीठ चवी नुसार, एक चमचा साखर.
कृती -: लसून, जीर, हिरव्या मिरच्या चांगल्या ठेचून घ्याव्या, भाजी बारीक चिरून, वाफून घ्यावी, थोडे पाणी शिल्लक असल्यास काढून घ्यावे. हवे तर थोडे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे, नंतर त्यात कणिक, ज्वारीचे पीठ, बेसन घालून एकत्रित करून तिखट, हळद, तीळ घालून थोडे मोहन करावे, व ठेचलेला मसाला, बारीक केलेली मेथी एकत्रित करून द्ह्यान घट्टसा गोळा तयार करावा. त्याच्या छोट्या पुर्या लाटाव्या व गरम तेलात तळून घ्याव्या. या हिर्व्यागार पुर्या दिसतातही छान व गरमागरम स्वादिष्ट लागतात.
Source : Marathi Unlimited.