भरली – खिमा वांगी

Like Like Love Haha Wow Sad Angry Khima wangi : Bharli Wangi or Khima wangi or stuffed eggplant is a...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Khima wangi :

Bharli Wangi or Khima wangi or stuffed eggplant is a traditional maharashtrian dish and it is always on top rank menu for many functions and wedding in the maharshtra. ground nuts and sesame seeds are used in this recipe for stuffing.

 

khima recipes tips

साहित्य–: ४ लांबट आकाराची मध्यम वांगी २ मध्यम आकाराचे बटाटे, ४ उकडलेली अंडी, पाव किलो खिमा, तीन मध्यम आकाराचे कांदे, ४ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा हळद, २ चमचे आले- लसून पेस्ट,१/२ चमचा गरम मसाला, २ चमचे व्हिनेगार,कोथिंबीर, मीठ, २ मोठे , च्चमच तेल.

कृती -: खिमा धुवून अर्धे आले-लसून पेस्ट व मसाला घालून शिजवून घ्यावा. तो कोरडा करावा.  ब्तात्याच्या लहान व पातळ फोडी कराव्या. कांदे बारीक कापावेत. अंडी सोलून बारीक तुकडे करावे. मिरची कोथिम्बिर बारीक कापावी, वांगी उभी कापावी पण देठाकडून कापू नये. दोन भाग करावे. आतील गर हलकेच काढून पोकळ करावे. वांगी मोडणार नाही याची काळजी घ्यावी. तेल गरम करायला ठेवावे. एकदम गरम झाल्यावर कापलेला अर्धा कांदा टाकावा. परतून चांगला झाला कि त्यात बटाटे घालून तेलात होऊ द्यावेव आले लसून पेस्ट, मिरच्या, मीठ व अंड्याचे तुकडे, हळद पूड घालावी. सर्व शिजवून काढावे, त्यात कोथिंबीर व शिजवलेला खिमा घालावा. सर्व मिश्रण ढवळून मिसळवून घ्यावे. नंतर वांग्याच्या पोकळ भागी हे मिश्रण भरावे व वांग्याचे दोन्ही भाग मजबूत स्व्च्छ जाड दोर्याने बांधून घ्यावे. पुन्हा तेल गरम करायला ठेवून कडक झाले कि त्यात उरलेला बारीक कांदा टाकून परतावा तांबूस झाला कि त्यावर भरलेली वांगी ठेवावी. भांड्यावर घट्ट  झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवून मंद आचे वर वांगी शिजवावी. वांगी मउ शिजली कि खाली काढून त्यात कोथिंबीर घालावी, वांगी तैयार झाली. नंतर त्याचे दोरे काढून घ्यावे. हे पोळी किंवा नान बरोबर फार छान लागतात.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories