खिम्याची बिर्याणी




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Khima Biryani :

Khima Biryani is a non-veg dish. If you are a non-veg lover then try  this recipe. learn the procedure and make the khima biryani for veg lovers. Ingredints and method is given in this post.

khima biryani marathi unlited

साहित्य-: अर्धा किलो खिमा, अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो कांदा, गरम मसाल्यासाठी, दोन दालचिनीचे एक ईंच तुकडे,  आले एक ईंच, तिखट, मीठ, दोन चमच धने, एक चमचा जिरे, पाण्यात भिजवून ठेवण्या साठीचा मसाला : तमाल पत्र, दालचिनी, लवंग, काळीमिरी, शहाजिरे, वेलदोडे, तूप, दही,दोन उकडलेली अंडी, दोन उकडलेले बटाटे.

कृती-: पंधरा मिनिट पूर्वी तांदूळ धुवून ठेवावेत, भांड्यात तूप टाकून त्यात पाण्यात भिजत टाकलेला गरम मसाला फोडणीस टाकावा, नंतर त्यातच तांदूळ टाकून ते चांगले परतून घ्यावे. त्यात साईचे दही  एक चमचा व मीठ घालून भात मोकळा शिजवून घेऊन परातीत काढून थंड करावा. त्याच बरोबर दुसर्या भांड्यात खिमा बनवावा.  कांदे उभे उभे कापून ते  गरम तुपात चांगले लालसर झाल्यावर त्यात वाटलेला गरम मसाला व मिरची पूड घालावी व खिमा टाकून तो कोरडा होईपर्यंत शिजवून घ्यावा. भाताचे तीन भाग व खिम्याचे दोन भाग करावेत. मोठ्यापसरत भांड्याला खाली तूप लावून त्यात  उकडलेल्या बटा- ट्याच्या चकत्या पसरवून ठेवाव्या, त्यावर भाताचा एक थर लावावा, त्या नंतर खिम्याच्या एका भागाचा थर लावून पुन्हा भात, त्यावर खिमा, त्यावर पुन्हा भात, व शेवटी उकडलेल्या अंड्याच्या चकत्या लावून मंद आचेवर बिर्याणीला चांगली वाफ द्यावी. थोड्याच वेळात खमंग बिर्याणी तयार होईल.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu