Kalingard and Kolambichi Bhajee:
We use only white portion to prepare this dish. Try this Kalingad recipe. You can use it as a side dish with your lunch or diner. In this recipe we use some maharashtrian masale.
साहित्य -: कलिंगड चा लाल भाग खाण्या साठी काढून, उरलेला पांढरा भाग घ्यावा. त्याची हिरवी साल काढून घ्यावी. नंतर पांढर्या भागाच्या पातळ व लहान फोडी करून घ्याव्या. चार वाट्या कलिंगडा च्या फोडी, एक मोठा कांदा, दीड वाटी ओले खोबरे, चार ते पाच लाल मिरच्या, एक चमचा धणे, चार-पाच मिरी, अर्धा ईंच हळकुंडाचा तुकडा, एक वाटी सोललेली पांढरी कोलंबी, दोन चमचे खोबरेल तेल.
कृती-: कांदा बारीक कापावा, कलिंगडच्या फोडी, कोलंबी व अर्धा कापलेला कांदा अगदी कमी पाण्यात शिजत ठेवावा. कारण कलिंगड ला अंगचेच पाणी सुटते. एक चमचा तेलात मिरच्या, धणे, हळदी चा तुकडा व मिरी जरा भाजून घ्यावी हा मसाला व खोबरं वाटून घ्यावे. कलिंगड व कोलंबी शिजली कि त्यात वाटलेला मसाला तेच मसाल्याचे पाणी व चवी नुसार मीठ घालावे, भाजीला घट्ट रस्सा राहील ईतकी शिजवावी. मग पळी मध्ये तेल तापवून त्यात उरलेला कांदा परतावा. कांदा बदामी झाला कि भाजीत पळीसहीत ठेवावा. भाड्याचे झाकण बंद करावे नंतर दोन मिनिटांनी पळी काढावी. हि भाजी भाता सोबत तोंडी लावावी. याच भाजीत सुकी कोलंबी घातल्यास भाजी रुचकर लागते.
Source : Marathi Unlimited.