भारत-पाक मधील संघर्ष हे वाढत चालले आहेत. आणि सीमा रेषेवरील जी गाव वसली आहेत त्यांना या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत आहे. चुरांदा, उरी आणि मेंढारमध्ये या गावांमध्ये अचानक सुरू झालेली चकमाचमक ह्या गावांकरिता फार नुकसान दायक आहे. पाकिस्तानच्या मुजाहीद कोणतंही कारण नसताना अचानक गोळीबार सुरू केला. तेव्हापासून पाकिस्तानी सैनिक भारतीय भूमीवर हल्ला करतायत आणि त्यात नियंत्रण रेषेवरचे नागरिक भरडले जात आहे. दोन्ही देश हे भांडण करून काय मिळवत आहेत असा प्रश्न येथील रहिवासी लोकांना येतो. आपसातील तंटे शांतता पूर्वक मिटवावी अशी अशा येथील लोकांची आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या चुरांदा या गावानं गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानकडून होणार्या आगळीकीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. 6 जानेवारी रोजी मोहम्मद दिन यांच्या घरातल्या जवळपास 17 जणांवर मृत्यूचं संकट ओढवलं होतं. सध्या येथील सामन्यांच जीवन फार आस्थाव्यस्त झाले आहे. ती सुरळीत आणण्या करीता हि आपसातील भांडण थांबबावी लागतील.
Source : Marathi Unlimited