टमाटर सॉस..




 Tomato Sos :

Tomato ketchup makes everything better. With this recipe you can make this all-time favourite condiment at home. Choose fresh red tomatoes for making this sos and use red color for good finishing.

tomato sos food recipes marathi unlimited

साहित्य-: अर्धा किलो टमाटर, पाव किलो साखर, थोडी जायफळ पूड, किंचित लाल जिलेबी रंग.

कृती-: टमाटर कुकर मध्ये एक सिटी होईस्तोवर उकडून घ्या, थंड झाल्या नंतर त्याचे साले काढून घ्या. नंतर टमाटर मिक्सर मध्ये थोडे फिरवून घ्या जास्त वेळ फिरवू नये कारण त्यातील बिया बारीक होऊ देऊ नये, त्याची पेस्ट तयार होईल,ती पेस्ट रवा चाळणीने गाळून घ्या. त्यातील बिया व राहिलेली साले निघून एकदम छान पेस्ट तयार होईल. मग स्टील पातेल्यात ती पेस्ट गरम करायला ठेवा. मंद जाळावर
सारखे ढवळीत रहा, म्हणजे बुडी लागणार नाही याची काळजी घ्या.व घट्ट होऊ द्या. नंतर त्यातील पाणी कमी होईल. नंतर साखर घाला. साखर घातल्या नंतर थोडे पातळ होईल. परत मंद आचे वर ठेवा त्यात  किंचित जायफळ पूड किंवा[ तीन वेलदोडे पूड  व जिलेबी रंग किंचित पाण्यात मिक्स करून त्या पेस्ट मध्ये घाला. त्यामुळे तयार होणार्या सॉस ला छान रंग येतो,व सेंट हि येतो, साधारण घट्ट झाले कि सॉस तयार झाले समजावे. थंड झाल्या नंतर काचेच्या बॉटल मध्ये भरून घ्यावे. हे सर्वांना आवडीचे सॉस आरोग्यालाही चांगले आहे.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड