लंडनमध्ये एका बांधकाम कामकाज सुरू असलेल्या बहुमजली इमारतीवरील क्रेनवर टक्कर लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. हि घटना दक्षिम मध्य लंडन मध्ये घटलेली आहे. हेलिकॉप्टर कोसळतच त्याला अचानक आग लागली, त्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. आगीचा हा तांडव बराच वेळ चालला. यावेळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. क्रेनला धडक बसल्यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले आणि त्यानंतर त्याने पेट घेतला. यावेळी मोठा स्फोटाचा फार मोठा आवाज झाला. या दुर्घटनेत कोणी जखणी झाल्याचे वृत्त अजून पर्यंत आले नाही. मात्र या भागातील वाहतूक रोखण्यात आली आहे. आणि काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते. या घटनेचे कारण मात्र लक्षात आले नाही. हेलिकॉप्टर ची धडक कशी झाली याची माहिती अजून पर्यंत मिळालेली नाही.
Source : Online Updates.