महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा ठपका ठेवत मनसेचे कन्नड विधानसभा मतदारसंघातील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला . महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये आमदार हर्षवर्धन यांना फार वायीट वागणूक मिळत होती त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडण्याचा विचार केलेला आहे. राज ठाकरेवर पहिल्यांदाज इतका मोठा आरोप लावण्यात आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेल्या जाधव यांनी मंगळवारी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली . मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. निवडणुकीच्या काळात तिकीट वाटपासाठी मनसेत पक्षप्रमुखांकडून पैशांची सर्रास देवाण घेवाण चालत असल्याचा खळबळजनक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरेंवर केला आहे. मनसे हा पक्ष हा फक्त पैसे कमवण्या करीतच बनला आहे. त्याचं उदेश फक्त पैसे मिळविणे आहे असे जाधव म्हणाले . `निवडणुकीदरम्यान मनसेत पैशांची देवाणघेवाण होते आणि मनसेतील या अर्थकारणामागे पक्षप्रमुखच` असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. हि देवाण घेवाण फार मोठ्या प्रमाणत चालते असे जाधव यांनी टीप दिले आहे. ‘राज यांच्या पीएने उमेदवारीसाठी 5 लाख रूपये घेतले’ .
Source : Online News Updates