Fast PizZa.
Fast pizza is homemade pizza recipe, including pizza dough and toppings, step-by-step instructions you can prepare this lovely pizza for your kids and family members. It includes some vegetables which is always good for our health.
साहित्य -: बारीक रवा एक वाटी, एक लहान कच्चा बटाटा, एका मिरचीचे बारीक तुकडे, चवी नुसार मीठ, तेल किंवा तूप, सिमला मिरची, एक टमाटर, मटार दाणे.
कृती -: रवा बुडेल ईतके पाणी घालून रवा एक तास भिजत ठेवावा. भिजल्या नंतर रव्यात चवी नुसार मीठ, मिरचीचे तुकडे, कच्च्या बटाट्याचा कीस घालावा. एक चमचा तेल घालून हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे फ्रायप्यन गरम करायला ठेऊन त्यावर तेल पसरून घ्यावे. तेल गरम झाले कि त्यावर ते मिश्रन पसरवावे. त्यावर सिमला मिरचीचे तुकडे मटार, टमाटर चे तुकडे टाकून चमच्याने थोडे दाबावे. त्यावर झाकण ठेऊन वाफ आणावी. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होईल. त्यावर किसलेले चीज घालावे. मुलांना हा फार आवडीचा असतो. हा टोमॉटो सॉस सोबत खाण्यास द्यावा.
Source : Marathi Unlimited.