Dhyanganga the search of life, If you are researching your life, then must read this article Dhyanganga.
Dhyanganga : Search of life.
ज्ञानं भागीरथी गंगा तत्र विश्राम्यतां मन: । प्रात: प्रभूति संध्यातं: प्रातरं तरं ।।३२,३३,६३।। क. गीता.।।
सोहं हि ज्ञांनगंगा होय या ज्ञानगंगेचे स्नान व जलपान जे करितात, त्यांचेच मन उन्मनी अवस्थेत तदाकार होते, आणि मनाला विश्रांती मिळते. ‘सोहं’ मंत्राचे स्मरण करणे म्हणजेच प्रात:काळ ते सायंकाळ व सायंकाळ ते प्रात:काळ अशी अह्र्निशी अखंड ‘संध्या’ समजावी. हे आपापल्या कुवती प्रमाणे करावे. जसे जलस्नानाच्या योगानें अंगावरील मळ जातो, भस्मस्नानाच्या योगानें त्वचेची शुद्धी होते. तसे या ‘सोहं’ मंत्र स्नानाने अंत: शुद्धी होते. आणि स्वरूपात डूबने हेंच ‘परमपद’ प्राप्तीचे साधन होय. या ‘ज्ञानतीर्था’ पुढे सर्व तीर्थ तुच्छ आहेत. यातीर्थ प्राप्तीने ज्याने स्वरूपरुपी जळात बुडी मारली असतां जन्म-मरणरुपी मळ धुवून निघतो. प्रत्येक जीव चौर्यांशी योणी फिरून शेवटी मानवकोटीत फार दिवसांनी येतो. यास्तव कपिलाषष्ठी सारखाच हा माहायोग व महपर्वंकाळ आहे असे जाणून प्रत्येक नरनारीने नारायण होण्या करितां या ज्ञाननदीत दिवस आणि रात्रं मिळून एकदा तरी स्नान करावे. या स्नानाने सर्व रोगांतून मुक्तता मिळेल.या नरदेहाचे वरून कितीही जलस्नान केल्यास त्याच्या अंतर्रभागात काय होणार? तो कोरडाच ! तसेच या अस्ती -मासाच्या पिंडास कितीही सुवासिक तेल, उटणे इ. लावून घासून जलाने धुवून, पुसून जरी स्वच्छ केलेंतरी त्याच्या अंतरभागांत कोणता परिणाम होणार ? जसा मलयपर्वतावर उगवलेला वेळू कधीही चंदन होऊ शकत नाही. तद्व्त बाह्य स्नान समजावे. ‘सोहं’ मंत्र ज्ञानाच्या योगाने राग, द्वैष दोषादिक मल जावून चित्त शुद्ध होते. हे स्नान मोक्षं देणारे आहे. हा जप ब्राम्ही काळात करावा; कारण या काळात सूर्याचे प्रखर तेज व अति अंध:कारही नसतो. नुसते प्रकाश रूप असते. सायंकाळी सूर्य आपल्या पूर्ण किरणांचा लय आत्म तेजांत करतो. तद्वत मनोवृत्तीचा लय दशवे द्वारी सोहम ब्रम्ह ज्योतीत करावा. साधकांची वृत्ती अंतर्मुख झाल्यावर नाभी स्थानी आत्मरविचा उदय होतो. व कुंडलिनी शक्ती जागृत होवून ती उर्ध्वमार्गाने जाताना. तेजपुंजकिरण हृदयात पसरवून, द्श्वेद्वारी येतांच ‘सोहं ब्रम्हज्योतीचे दिव्य लखलखाट प्रकाश युक्त दर्शन होते. हा ब्राम्ही काळ अरुणोदय प्रभात काळाच्या अगोदर तीन तास असतो.आकार, उकार, मकार। अर्धमातृका मूळमाया थोर ।। शून्य सोहं सर्वेश्वर । दशवे द्वारी साक्षी असें ।।
ओंम रुपी (प्रणव) या एकाक्षर ब्रम्हाची अर्धमातृका या मूळमाये पासून रज, तम, सत्व हे तीन गुण उत्पन्न झालें. आणि यागुनांपासून सशक्तीय तीन दैवतें उत्पन्न झाली. रजोगुणा पासून ‘ ‘सावित्री-शक्तिसह ब्रम्हदेवं ‘प्रगट झालें. व तमोगुणां पासून ‘पार्वती- शक्ती सह शंकर प्रगट झाले. आणि सत्वगुणापासून सुंदर मनमोहक अवयवांचा लक्ष्मी-शक्तीसह विष्णू ‘ प्रगट झाले. शुण्यरूपी सोहं ज्योर्तिब्रम्हाने’ त्रिगुणात आपले स्वयंभू तेज एकवटून ”सहस्त्ररश्मि भनवान श्री सूर्य नारायण उत्पन्न केला. त्याच प्रमाणे सोहं परमेश्वराने त्रीगुनांत आपली बोधमय शांती एकवटून ”शीतल चंद्र” उत्पन्न केला. या पंचदेवता ”सोहंब्रम्हाच्या” आज्ञेनुसार सृष्टी व्यवहार करितात.
वाराणासी: या क्षेत्राचे ”अविमुक्त क्षेत्र” असे म्हणतात. ‘दोन भुवया व नाशिकाचे मुल’ यां तिघांचे’ जे संधी स्थान ते अविमुक्त क्षेत्र होय. नासिका म्हणजे ‘स्वर्गलोक’ व कपाळ म्हणजे परलोक या दोन्हीचा संधी तेच अविमुक्त ! ‘वारणा आणि नासी’ या दोन नद्यांच्या संगमा वर हे क्षेत्र आहे म्हणून यास ”वाराणसी” म्हणतात.
Source : Marathi Unlimited.