Bel Juice :
It is an excellent cooler for stomach during summers and can be consumed to get rid of heat or Loo. It helps control Cholesterol. It contains a lot of Anti-oxidants which help to cure the gastric ulcers. The pulp of Bael has anti-proliferative properties.
हे शरबत शीतकारक उन्हाळ्यात आराम दायक व उष्णतेच्या विकारांन पासून दूर ठेवणारे आहे. पिकलेले बेलफळ तोडून त्याचा आतील गर काढावा. व तो तीन चार घंटे पाण्यात भीजायला घालावा. नंतर कळून सूप गाळण्याच्या गाळणीने गाळावा. तो गर्जे नुसार पाणी चवीपुरते मीठ साखर व बर्फ घालून प्यावे. पण उन्हाळ्यासाठी ठेवण्याचे असल्यास. या प्रमाणे बेलफळ ठेवावे, ते असे पिकलेल्या बेलफळाचे गर काढून त्यातील बिया काढून टाकाव्या. नंतर तो गर एका काचेच्या मोठ्या तोंडाचे बॉटल मध्ये ठेवावा व त्यात एका बेलफळाला एक मोठी वाटी या प्रमाणे साखर टाकावी, थोडे मीठ टाकून कडक उन्हात ठेवावे. त्याने साखरेचे पाक होईल, पाकात गर पूर्णपणे बुडलेले आहे का याची काळजी घेणे. कमी असल्यास पुन्हा थोडी साखर घालुन पाक होऊ देणे. ते बरेच दिवस टिकावू होते. जेव्हा वाटेल तेव्हा त्याचे शरबत करून आपण पिऊ शकतो.
Source : Marathi Unlimited.