Alu wadi.
Alu Wadi is a savory dish made with Taro leaves. It’s a popular maharashtrian dish prepared during special occasions and festivals. Altogether, the taste is jumbled, but yeah it’s NICE!
अळू वडी ( धोपां पाने ) – साहित्य :- सहा ते आठ अळू ची पाने एक मोठी वाटी बेसन पिठ, अर्धी वाटी तांदळाची पिठी, पाव वाटी बाजरीचे पिठ, गुळ, लिंबू, एक केळे, लसून ५ ते ६ पाकळ्या, चमचाभर ओवा, तिखट, काळा मसाला, मीठ, चमचाभर दही, तळणासाठी तेल.
कृती -: प्रथम अळूचे देठ काढून पाने स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यावी. बेसन, तांदूळ, बाजरी पीठ एकत्र करून त्यात ओवा, लसणाची पेस्ट, तिखट, काळा मसाला एक चमच, मीठ चवी नुसार टाकून (गूळ पाण्यात मिसळून लिक्विड करावा) गुळ हे सर्व पिठात घालून थोडे घट्टसर भिजवावे, त्यातच दही, लिम्बाचां रस, केळे बारीक करून टाकावे. या मिश्रणाला एकत्रित करून थोडे फेटावे. पानाच्या मागील भागाकडून हे मिश्रण पसरावे, त्यावर दुसरे पान उलटे टेवावे. म्हणजे देठाचा भाग पिठाचा भागाने करावा. या प्रमाणे तीन किंवा चार पानाची एक वळकटि तयार करावी त्याच्या कडा व्यवथित बंद कराव्या मग या वळकट्या वाफेवर वाफवून घ्याव्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात (पाटोडी प्रमाणे) त्या गरम तेलात तांबूस तळून घ्याव्या. या तांका सोबत किंवा टोमॉटो सॉस सोबत खान्यास द्याव्या.
Source : Marathi Unlimited