तिच्या डोळ्यांतील अश्रु जेव्हा ………
आपल्या डोळ्यांतुन ओघळतातं ….
ते प्रेम असतं …….
तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा …..
तिच्या गालावरील खळीतुन खुलतं …..
ते प्रेम असतं …….
जेव्हा तिच्या आठवणीच ……..
तुमचा श्वास बनतातं …….
ते प्रेम असतं ……
जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल…..
तुमच्या ह्रदयाची स्पंदनं वाढवते …..
ते प्रेम असतं …..
तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी …..
नकळत सांगुन जाते की ……
या जगात आपलं हक्काचं कुणीतरी आहे …..
ते प्रेम असतं ……
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी ……
एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन
जातो …..
न बोलताच भावना व्यक्त होतात …..
ते प्रेम असतं ……
विरहाचा प्रत्येक क्षण जेथे ……
युगांसमान भासतो …..
ते प्रेम असतं ……
चांदण्या रात्रीतील रेश्मी स्वप्नं…..
दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं…..
काही हळुवार क्षणांना दोघंही जिवापाड
जपतातं ….
ते प्रेम असतं ……
जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण …..
अन् त्यांच अचुक लक्ष्य असतात तुम्ही…..
हेच ………. हेच तर प्रेम असतं ……… !
Source: Marathi Unlimited
4 Comments. Leave new
Whha mast
मराठी अनलिमिटेड ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद…
1no dil ko hila dala yarr
मराठी अनलिमिटेड ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद…