Stress Mind, Many people they used to drink for removing there stress, read how to fight against your stress.
ताण घालविण्यासाठी योग्य वाटणारा अयोग्य उपाय ! ( How to Remove your Stress )
संपूर्ण जगात आज मद्यपान करणार्यांच्या संखेचे प्रमाण वाढत आहे.या करीता कारणांचेहि ताळमेळ नाही कोणनतेही कारण काढून अगदी मन मानेल तितके मद्यपान करतात. संशोधनातून आढळून आले कि ब्रिटन मध्ये दिवसभर्याचा तणाव घालविण्या साठी देशातील दोन तृतीयांश नागरिक मद्याच्या चषकात बुडतात. तेही जास्तीत जास्त ३५ ते ४५ वयोगटातील नागरिक सहभागी असतात. त्यातील पाच मध्ये ऎक पुरुष तर सहा मध्ये ऎक महिला याप्रमाणे रोज मद्यपान करण्याचे कबूल करतात. सरकारने मद्यपान करण्या विषयीची कांही मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. त्याचे पालन केले जात नसल्याचे यातून स्पष्ट होते. अजून त्याची वेगवेगळी कारणे आहेत. कुणी आर्थिक तणावाने तर कुणी मानसिक विवंचनेत मद्याचा आधार घेतात, पण नागरिक कुठलाही असो मद्याचा आधार घेऊन नशेत राहील्याने फक्त तेवढ्या पुरत्या वेळेत मानसिक तणाव दूर होत असला तरी आपल्या या विचित्र कृत्याने कुटुंबात प्रत्येक सदस्यास किती त्रास किंवा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागते याचा विचारच कधी मद्यापी करीत नाही.
त्या मद्यापि मुळे आज किती तरी अघोरी कृत्ये समोर येतात, कितीतरी जीव बळी जातात हे प्रत्यक्ष बघायला मिळतात.संपूर्ण प्रपंच उद्वस्त झालेले आपण पाहतो.पण तरी त्या कडे दुर्लक्ष होत आहे.या मागे पोलिस खाते यांचे कमजोर शासन आणि भ्रष्टाचार हेच जामीन आहेत, कमकुवत शासनाचे आधार घेऊनच हे कृत्यकारी निर्दोष मुक्त होतात. या कृत्यांना आरक्षणच उरलेले नाही.
Source : Marathi Unlimited