आले कळून मजला कि तो बनाव आहे
वस्तीत मात्र त्यांचा नुसता तणाव आहे
हरले बरेच काही खेळात जिंदगीच्या
शिल्लक अजून माझ्या हातात डाव आहे
शिल्लक अजून माझ्या हातात डाव आहे
झाले फितूर काही विश्वास टाकतांना
कमजोर या छताचे उरले ठराव आहे
मी झोपडीत माझ्या उरलोय एकटा अन
घेराव हा मलाही करतोय गाव आहे
माझेच का मला ते विकतात शल्य सारे
मी दाबला कधी ना माझा स्वभाव आहे
“विनोदास” आता दे दिव्य तू जरासे
माझे मलाच हसते शब्दात नाव आहे…
Source : Marathi Unlimited