संत शिरोमणी नामदेव महाराज




Like
Like Love Haha Wow Sad Angry
21

sant namdev maharaj

(Sant Shirmany Namdev Maharaj )भक्ती प्रेमाची बहार उडवून दिलेल्या या महा भागाने देह भान विसरून हाती विना घेऊन,मुखी हरीनाम धरून आणि अन्नोदक सोडून पंढरीच्या राउळात कवित्व करीत कीर्तनाचा सोहळा पार पाडला, ” केशव तोचि नामा । नामा तोचि केशव।।” ( Keshav tochi nama, nama tochi keshav ) या अद्वैकाच्या भूमिकेतून देवाशी जवळीक केली. आपली भक्ती ज्ञानाने डोळस राहील हे पाहिलेआणि ज्ञानाला भक्तीचा ओलावा दिला. ” श्री हरी श्री हरी ऎसे वाचे म्हणेन। वाचा धरिसी तरी श्रवणी ऎकेन ।। श्रवणी दाट्सी तरी मी नयनी पाहीन । ध्यानी मी ध्याईन जेथें तेथें ।। जेथें जायें तेथें लागलासी आम्हां । न संडी  म्हणे नामा वर्म तुझें ।। देवाशी असे बोलणे केलें. त्यासाठी अभंगसंकीर्तनाचे माध्यम स्वीकारले.आपल्या अभंगाने मराठीचे राउळ दुमदुमून सोडलेल्या नामदेवांनी हरिनामाचा सुकाळ एवढ्या जिवाभावाने केला कि ”विठ्ठ्ला” ( Shri Witthala ) च्या नावाला त्यामुळे एक प्रकारची भव्यता प्राप्त झाली. त्यांच्या कवित्वाने बहारीचे कल्पना वैभव प्रगट केले. आपण व आपले आराध्य दैवत ‘ श्री विठ्ठल यांच्या सहवासात जवळीक साधली.तसेच भाषेतील साधेपणाचे रहस्य लक्षात घेवून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला. आणि ” भक्तांचे ते गाणे बोबडिया बोली। तें तें विठ्ठलीं अर्पियली।।..हि कवित्वाची बैठक स्विकारली ते म्हणजे– तुचि माझे व्रत तूंची माझे तीर्थ । तूची धर्म अर्थ कांम देवा।।

आणि त्यांचे सार म्हणजे— नाचू कीर्तनाचे रंगी।ज्ञान दीप लावुं जगी ।। जणू भागवत धर्म प्रचाराचा झेंडा हाती घेतला.त्यांच्या कविता आत्मविष्काराचे साधन बनले.  विठ्ठल भक्तीचा आस्वाद पुरा करून त्यांचे काव्य लेखन हे पौराणिक ठरले,त्यांच्या अभंगातून  विठ्ठल भक्तीचीप्रीती हि उत्कंठ्ता आढळून येते,त्यांच्या अभंगातून भगवत प्रेमाच्या विविध छटा निरनिराळ्या भूमिकेतून कशा साकारलेल्या आहेत हे कळते….  महामुक्ती क्षेत्र  तीर्थाचे ( Mahamukti Tirth ) तारक ।उपमेशी आणिक नाही दुजें ।। ते हे पंढरपूर प्रेमाचे भांडार। नामे निरंतर गर्जतसे।।– त्यांच्या कवित्वा मुळे सामान्य जणांच्या बुद्धीस मोठा चटका लागतो. वाचनातून, पठ्नातून,गायना मधून आणि वारकर्यांच्या भजन कीर्तनातून आपले वेगळेच स्थान निर्माण केलेले आहे. ”अमृता हूनी गोड नाम तुझे देवा” असे नामदेवांनी कां म्हटलेले आहे याचा उलगडा होतो. त्यांनी अवघ्या ब्रम्हांडाचे दर्शन ज्या पंढरीत घेतलेत. तेथील लेखनात  काव्य, भक्ती आणि ज्ञान याचा सुरेख संगम  ”श्री  नामदेव गाथा ” या पुस्तकातून अनुभवन्यास मिळतो, हि गाथा अवश्य पठन करा.जीवनाचे सार्थक करून घ्या.

Source : Marathi Unlimited.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
21




, , , , ,



Menu