ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं. मात्र, त्याची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. कारण पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३०९ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर ३०९धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिका १ – ० अशीजिंकली . या जेतेपदासह ग्रॅम स्मिथ अँड कंपनीने कसोटीतीलआपले अव्वल रँकिंग कायम राखले . पॉंटिंगला आपल्या अखेरच्या कसोटी डावातही त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करता आला. रॉबिन पीटरसनच्या गोलंदाजीवर जॅक कॅलिसने पॉंटिंगचा आठ धावांवर असताना झेल टिपला. आपल्या खराब कामगिरीमुळे त्यानं हा निर्णय घेतलाय. ३८ वर्षीय पॉन्टिंगच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ३९ वर्षीय भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर निवृत्तीचा दबाव आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Source : Marathi Unlimited