परसा भागवत व नामदेव यांचा संवाद
Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache-abhang5

परसा भागवत व नामदेव यांचा संवाद !
परसा म्हणे नामयासी । अरे नामदेवा परियेसी ।।
तू तव द्वडिल्या न जासी । मनी न लाजसी अझुनि ।।
परसा वदे नामयासी । तुझे पूर्वज माझे चरणा पाशी ।
जरी तू हरिदास जालासी । तरी याति हिंनची ।।
तुवा कोठवरी काय देखिलें । नाही वेद शास्त्र म्हणितले ।
ऐक तुजची जाणितले । ईतुके जालें सांगावया ।।
आणिक सांगेन एक । तू ठायिंचाचि वासनीक ।
मातें लाविसी मौन टिळक । तेथें पाईक काय करी ।।
तयासी त्वां कौटिल्य केलें । सहस्त्र वैष्णवांमाजीं मुरळे ठेलें ।
तंव ते उमगो लागले । मग भुलले  आपोआप ।।
ऐसा तू कवटाळीया पाही । तुझे पूर्वज माझे पायीं ।
मग शंका धरिसी  कांही । अझुनी तरी विचारी पां ।।
तुजसी करितां वादक । तरी हे शंकतील लोक ।
तुं तव माझाची सेवक । विष्णू दासा म्हणे परसा ।।७।।

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu