Mulanna Ajachi Awashyak Samaj, Its very necessary today’s that your children must in your control, team them in proper way.
आजच्या युगात ( Today’s world )आपल्या पाल्यांना आपल्या अर्थ व्यवस्थेची माहिती असायलाच हवी. आपण जरी त्याना या बाबत कळू दिले नाही तरी ती आपल्या समजे नुसार माहिती ठेवतात. मग त्या पेक्षा त्याना आपल्या वरील विश्वास व आपणहि त्यांच्या वर विश्वास ठेवतो. हे तेवढेच महत्वाचे आहे.} आज बँकेत मुलांची खाती उघडली जातात. त्याना डेबिट-क्रेडीट कार्ड्सहि दिले जातात. मात्र त्यांना आर्थिक स्वातंत्र्य केव्हा आणि कितपत द्यायचे याबाबत पालकांना प्रश्न निर्माण होतो. मुल केव्हाही आपल्या पेक्षा जास्त ज्ञान ठेवणारे असतात हे लक्षात घेऊन त्याना योग्य ती माहिती देण्यास चुकू नका, त्यांना जितक्या लवकर आर्थिक माहिती दिली जाईल तितकच त्यांना पैशाच महत्व लवकर समजेल, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी (Financial Condition )आहे हे त्याना समजाऊन सांगा.
आपले पालक किती आणि कुठल्या प्रकारे कमवितात तसेच गुंतवणूक किती, कशी करतात हे समजणे आवश्यक आहे. मिळकत आणि खर्च याचे कोष्टक त्यांना माहित हवे. कारण आजची मुले फार लवकर घरा बाहेर जातात व दुसर्या कडून नवनव्या वस्तूंच्या खरेदी बघतात. त्यातूनच त्यांना वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीची ईच्छा प्रगट होते. पण मुलाला बँकेची खाती आपण उघडून देण्या सोबत त्याना बचतीची सवय व खर्चाचे नियोजनहि (Budget Management Understanding )समजावणे तितकेच महत्वाचे आहे.
तसेच आपले आवश्यक खर्च काय आहेत ह्याची कल्पना त्याना जरूर द्या. आणि त्या पलीकडील आवश्यक खर्च ( Useful Expense ) हे सुद्धा त्याना कळू द्या, म्हणजे एकदा त्याना पैशाचे सूत्र [आवक-जावक] समजले कि ते स्वत:च सर्व बजेट लावण्यात पालकांना मदत करतील. मुलांना विश्वासात घ्या. त्याना आर्थिक बजेटची प्राथमिक माहिती असू द्या. म्हणजे घरातील एकमेकांतील खरेदी बद्दल मतभेद होणार नाही.आणि स्वत:च्या खर्चावर नियंत्रण ठेवतील. त्यामुळे पुढे त्याना बचतीची सवय लागेल. व्यवहारिक ज्ञान ( Common sense )वाढेल.
Source : Marathi Unlimited.