मयुरादि पक्षी नृत्य करिताती । नद्या वाहताती दोन्ही थड्या ।।
भूमीवरी सडे केशर कस्तुरी । आनंद अंतरी सकळानच्या ।।
विमानांची दाटी सुरवर येती । गंधर्व गाताती सप्तस्वरे ।।
मंदमंद मेघ गर्जना करिती । वाद्ये वाजती नानापरी ।।
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती । अप्सरा नाचती आनंदाने ।।।।