1
कृष्णाचे कीर्तन नावडे ज्या नरा । जन्मनि अधोरा पडे नरकी ।।
कृष्णाचे श्रवण नाईके जो कानी त्यासी मेदिनी ठाव कैचां ।।
कृष्ण-विष्णूकथा नावडे पै नित्य । त्यासी पै सत्य ग्रह बाधी ।।
राम-कृष्ण हरी न पाहे पै मूर्ती । तया यम नेती अंती जाणा ।।
नामा म्हणे हे नर कलियुगी उदंड । घरोघरी पाखांड करिताती ।।५।।
…………………………………………………………………..
मुखी नाही नाम । काय जपतो श्री राम ।।
काय आसन घालून । मुखी नाही नारायण ।।
टिळे टोपी माळा दावी । भोळ्या भाविकांसी गोवि ।।
नामा म्हणे त्याचा संग । नको चित्ता होय भंग ।।
Source : Marathi Unlimited
1