काही सांगोनी गेले वचना

Like Like Love Haha Wow Sad Angry काही सांगोनी गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडूनंदना ।। येथे राहता पावि जे...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache-abhang5

काही सांगोनी गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडूनंदना ।।
येथे राहता पावि जे बंधना । थोर वर्तमान कलियुगी ।।
या कलीमाझारी । पुत्र पित्याचे वैरी ।।
धरतीमाता होय कामारी । पुरुषांते नारी अव्हेरिती ।।
न येती वृक्षा फळे आटती धेनु । न पिके मही न वर्षे धनु ।।
यापरी आटेल सकळ जणू । असे जगजीवनु बोलिले ।।
आणिक वर्तेल एक अपवित्र । ब्राम्हण सांडतील वेदमंत्र ।।
आचार सांडूनी होती शुद्र । एसे अपवित्र कलियुगीं ।।
थोर वर्तमान पडेल काळु । चहु वर्णाचा होईल एक मेळु ।।
कोणी कोणाचा न धरती विटाळु । मग गोपाळु निघते जाले ।।
आता वेळोवेळा सांगो किती । मोडला धर्म जाली प्रवृत्ती ।।
विष्णू नामा येतो कांकुळती । किसे नि करू भक्ती पंढरीराया ।।।।

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories