भारत ऑलिम्पिकमध्ये नेहमीच खराब प्रदर्शन करतो हे तर सर्वांना माहीतच आहे. पण आता आपला संघ पुढे ऑलिम्पिक मध्ये दिसणार सुधा नाही. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत (आयओए) शासकीय हस्तक्षेप होत असल्याबद्दल कठोर कारवाई म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) आज भारताला ऑलिम्पिक चार्टरमधून निलंबित केले. स्वित्झर्लंडमध्ये आयोजित आयओसीच्या कार्यकारी बोर्डाच्या दोन दिवसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निलंबनामुळे आयओसीकडून मिळणारी आर्थिक मदत ताबडतोब थांबेल; शिवाय भारतीय अधिकार्यांना ऑलिम्पिक बैठका तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. या कारवाईमुळे भारतीय अॅथलिट्सना ऑलिम्पिकच्या इव्हेंटमध्ये सहभागी होता येणार नाही. या निर्णयामुळे भारताची ऑलिम्पिक स्तरावर चांगलीच नाचक्की झाली आहे. भारताने अंतरास्त्रिया ऑलिम्पिक संघटनेचे उल्लंघन केल्यामुळे हि कारवाई करण्यात आलेली आहे असे सांगण्यात येते. आता पुढे भारताचे ऑलिम्पिक चे भविष हे तर वेळच ठरवेल
Source :Marathi Unlimited.