भारतात जणू काही, काळा पैसा ( Black Money ) कमावण्याची शर्यत चालली आहे, जिथे तिथे काळ्या पैशाचा महामार आहे. जो तो काळा पैसा कमावण्याच्या मार्गावर आहे. भारतातील विविध समाज सेवक जसे अण्णा हजारे, बाबा रामदेव आणि अरविंद केजरीवाल यांनी काळ्या पैशाबाबद आंदोलन केले मात्र त्यांच्या या आंदोलनाला काही यश मात्र आले नाही. `ग्लोबल फिनान्शियल इंटेग्रिटी` म्हणजे (जीएफआय) प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे म्हटले गेले आहे कि कला पैसा मिळवण्यात भारत आठव्या क्रमांकावर ( On Eighth Place )आहे. आता पर्यंत भारतातून सुमारे १२३ अब्ज डॉलर व स्वातंत्र्यापासून २०१० पर्यंत सुमारे २३२ अब्ज डॉलर एवढा काळा पैसा भारताबाहेर नेण्यात आला. या काळ्या पैश्यामुळे बऱ्याच देशांचे आर्टिक नुकसान सुधा होत आहे. जर भारत याच पद्धतीने काळा पैसा भरत बाहेर पाठवत राहिला तर , भारताला काला पैसा कमावण्याचा पहिला नंबर मिळवण्याला फार वेळ लागणार नाही.
Source : Marathi Unlimited.